परभणी : गौण खनिजाचे अवैध उत्खनन जोरात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:58 AM2019-02-17T00:58:27+5:302019-02-17T00:58:43+5:30

शहरातील नेमगिरी रोड, ज्ञानोपासक महाविद्यालय परिसर, मैनापुरीचा भाग, एमआयडीसी या भागातून दररोज हजारो ट्रॅक्टर मुरमाचा अवैधरित्या उपसा होत आहे. महसूल प्रशासन या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

Parbhani: illegal mining of minor minerals continues to be loud | परभणी : गौण खनिजाचे अवैध उत्खनन जोरात सुरू

परभणी : गौण खनिजाचे अवैध उत्खनन जोरात सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : शहरातील नेमगिरी रोड, ज्ञानोपासक महाविद्यालय परिसर, मैनापुरीचा भाग, एमआयडीसी या भागातून दररोज हजारो ट्रॅक्टर मुरमाचा अवैधरित्या उपसा होत आहे. महसूल प्रशासन या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
तालुक्यामध्ये एकीकडे अवैध वाळू उपसा जोरात सुरू असताना गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे. जिंतूर शहराचे भूषण असलेले मैनापुरी देवस्थान जवळील सर्व डोंगराचे उत्खनन झाल्याने हा भाग ओसाड पडला आहे. या ठिकाणाहून हजारो ट्रॅक्टर मुरुम चोरून नेल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, शहरालगत असणारा डोंगर भाग, ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला तसेच नेमगिरी रोड या भागात पण अशीच अवस्था आहे. प्रशासनातील काही जणांना हाताशी धरून हा उपसा जोरात सुरू आहे. ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला दररोज अनेक वाहनांद्वारे मुरुमाचा उपसा होतो. परिणामी शासनाच्या हजारो रुपयांच्या महसुलावर पाणी फेरल्या जात आहे. जिंतूर शहराप्रमाणेच कौसडी येथूनही मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केले जात आहे. महसूल कर्मचारी आणि यंत्रणेतील काही जणांचे लागेबांधे असल्याने दररोज सर्रास मुरुमाचा उपसा केला जात आहे. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा ºहास होत असून, वेळीच कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
प्रशासनाला लाखोंचा चुना
मुरूम उत्खनन करणारे माफिया प्रशासनाला दोन ते चार ट्रॅक्टरची रॉयल्टी भरतात. मात्र अनेक ट्रॅक्टर मुरुमाची चोरी केली जात आहे. यात शासनाचे लाखो रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. जिंतूर शहरासह येलदरी, बामणी, वझर, चारठाणा, आडगाव, कौसडी, बोरी या भागात उत्खनन झालेल्या जागेची स्थळ पाहणी करून नेमक्या किती रुपयांचा मुरूम उत्खनन झाला, याचा शोध महसूल विभागाने घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Parbhani: illegal mining of minor minerals continues to be loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.