परभणी : मुलींसह प्रियकरांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:18 AM2018-05-20T00:18:57+5:302018-05-20T00:18:57+5:30

आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिच्या दोन मुलींसह त्यांच्या प्रियकरांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात १८ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

Parbhani: FIR against girls against girls | परभणी : मुलींसह प्रियकरांविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी : मुलींसह प्रियकरांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिच्या दोन मुलींसह त्यांच्या प्रियकरांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात १८ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात मयत वंदना साळवे यांचे वडिल दामोधर डंबाळे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, वंदना साळवे हिचे पती मयत झाल्यानंतर ती सेलू येथेच आपल्याकडे वास्तव्याला होती. वंदना यांच्या मुली उर्मिला व शिवाणी या त्यांच्या सोबत राहत नव्हत्या. त्यामुळे वंदना साळवे नेहमी चिंतेत असायच्या. गुरुवारी घरातील जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले.
शुक्रवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास माझी पत्नी जागी झाली तेव्हा तिला वंदना साळवे या जागेवर आढळल्या नाहीत. त्यामुळे आम्ही सर्वांनी वंदनाचा शोध घेतला. तेव्हा घराच्या पाठीमागील खोलीत ओढणीच्या सहाय्याने वंदनाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
वंदना साळवे यांना त्यांच्या दोन्ही मुलींची वागणूक पटत नव्हती. या दोन्ही मुली व त्यांचे प्रियकर नेहमीच वंदना यांना शिवीगाळ व मारहाण करीत असत. प्रसंगी जीवे मारण्याच्या धमक्याही देत होते. या सर्व प्रकाराला कंटाळून माझी मुलगी वंदना हिने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच आत्महत्या करण्यापूर्वी वंदना हिने चिठ्ठीही लिहून ठेवली. त्याचप्रमाणे डाव्या हाताच्या तळहातावर दोन्ही मुली व त्यांच्या दोन्ही प्रियकरांची नावे लिहिली आहेत. वंदना हिच्या आत्महत्येस तिच्या दोन मुली व प्रियकर जबाबदार असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
दामोधर डंबाळे यांनी दिलेल्या या फिर्यादीवरुन उर्मिला दिनेश साळवे, शिवाणी दिनेश साळवे, रवि बबनराव वटाणे, संतोष सोपान गायकवाड या चौघांविरुद्ध आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे, बीट जमादार यु.के. लाड, उमेश बारहाते हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: Parbhani: FIR against girls against girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.