परभणी: मार्चएंडमुळे शासकीय कार्यालयात रविवारीही कर्मचाऱ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:07 PM2019-03-31T23:07:07+5:302019-03-31T23:09:09+5:30

आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा दिवस असल्याने शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये रविवारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली़ शिवाय बँकाही सुरू होत्या़

Parbhani: Employees' presence in the government office due to the March-end | परभणी: मार्चएंडमुळे शासकीय कार्यालयात रविवारीही कर्मचाऱ्यांची उपस्थिती

परभणी: मार्चएंडमुळे शासकीय कार्यालयात रविवारीही कर्मचाऱ्यांची उपस्थिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा दिवस असल्याने शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये रविवारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली़ शिवाय बँकाही सुरू होत्या़
३१ मार्च रोजी २०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपणार असल्याने या दिवशी विविध शासकीय योजनांच्या निधी खर्चाचा आढावा व शिल्लक राहिलेल्या निधीचे समर्पण करण्याची प्रक्रिया शासकीय अधिकाऱ्यांना पूर्ण करावी लागते़
त्या अनुषंगाने ३१ मार्च रोजी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, भूमीअभिलेख कार्यालय, कोषागार अधिकारी कार्यालय आदी शासकीय कार्यालयांमध्ये तसेच प्रशासकीय इमारत परिसरातही कर्मचाºयांची गर्दी दिसून आली़
रविवारी सकाळी १० पासून रात्री ८ वाजेपर्यंत कर्मचारी कार्यालयात बसूनच होते़ दुसरीकडे आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा दिवस असल्याने विविध राष्ट्रीयकृत बँका सुरू असल्याचेही पहावयास मिळाले़ या बँकांमध्ये शासकीय निधीच्या अनुषंगाने विविध व्यवहार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सांगितली़
४जिल्हा कचेरीतील कोषागार अधिकारी कार्यालयात रविवारी कामकाज झाले़ जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांशी संपर्क साधत येथील कर्मचारी शेवटच्या टप्प्यातील कामकाज करीत असल्याचे दिसून आले़

Web Title: Parbhani: Employees' presence in the government office due to the March-end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.