परभणी :पारदर्शक तपासणीच्या दुर्लक्षामुळेच धान्य घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:28 AM2019-01-17T00:28:57+5:302019-01-17T00:29:54+5:30

सखोल व पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाख रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे़ त्यामुळे या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाºयांवरही कार्यवाही होणे गरजेचे आहे़

Parbhani: Due to the lack of transparency investigation, grain scam | परभणी :पारदर्शक तपासणीच्या दुर्लक्षामुळेच धान्य घोटाळा

परभणी :पारदर्शक तपासणीच्या दुर्लक्षामुळेच धान्य घोटाळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सखोल व पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाख रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे़ त्यामुळे या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाºयांवरही कार्यवाही होणे गरजेचे आहे़
पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाखांचा घोटाळा झाल्याची बाब १० जानेवारी रोजी उघडकीस आली होती़ या संदर्भातील वृत्त ११ जानेवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती़ या प्रकरणात जिल्हाधिकाºयांनी गोदामपाल एस़एम़ कांबळे यांना निलंबित केले आहे; परंतु, येथील गोदामाची नियमित तपासणी करण्याची जबाबदारी ज्या अधिकाºयांवर होती, त्या अधिकाºयांवर मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही़ या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी पालमचे पुरवठा निरीक्षक तथा प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती़ त्यानुसार कदम यांनी जिल्हाधिकाºयांना मंगळवारी खुलासा सादर केला आहे़ या खुलाशात त्यांनी स्वत:चीच बाजू मांडल्याचे समजते़ त्यामुळे त्यांचा खुलासा जिल्हाधिकारी कितपत स्वीकारणार याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़ मुळातच पालम येथील गोदामाची नियमितपणे तपासणी होणे आवश्यक होते़ परंतु, तशी तपासणी झाली नसल्यामुळेच धान्य अपहाराचा प्रकार झाल्याची चर्चा होवू लागली आहे़ जून २०१७ पासून गोदामपाल कांबळे यांच्याकडे पदभार होता़ त्यानंतरच गेल्या सहा महिन्यांमध्ये धान्य अपहाराचा प्रकार झाल्याचे समजते़ त्यामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये ज्या ज्या अधिकाºयांनी या गोदामाची तपासणी केली व पारदर्शकता बाळगली नाही, असे सर्व अधिकारी या प्रकरणात दोषी आढळत आहेत; परंतु, त्यांच्यावरील दोषारोप प्रशासनालाच सिद्ध करावा लागणार आहे़ अन्यथा केवळ एका कर्मचाºयावर कार्यवाही करून धान्य घोटाळ्याचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न प्रशासकीय स्तरावरून होवू शकतो. तशी भीतीही कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे़ आतापर्यंत उघडकीस आलेल्या धान्य घोटाळ्यात कर्मचाºयांबरोबरच अधिकाºयांवरही कार्यवाही होणे अपेक्षित होते; परंतु, तशी कार्यवाही झालेली नाही.
मुंबईच्या पथकाने ओढले ताशेरे
परभणी येथील पुरवठा विभागाच्या गोदामातील धान्य घोटाळा दोन वर्षापूर्वी मुंबईच्या पथकानेच उघडकीस आणला होता़ या पथकाची नियमितपणे गोदाम तपासणी होत असते़ त्या अनुषंगाने २५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत या पथकाने जिल्ह्यातील १० गोदामांची तपासणी केली़ सर्वात शेवटी या पथकाने पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामाची तपासणी केली़ त्यानंतर तयार केलेल्या अहवालात पथकाने गोदामाची सखोल आणि पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच धान्य घोटाळा घडल्याचे नमूद केले आहे़ त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत या पारदर्शकतेकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांवरही कार्यवाहीचा बडगा उगारणे आवश्यक आहे़

Web Title: Parbhani: Due to the lack of transparency investigation, grain scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.