परभणी : दबलेल्या रस्त्याची कंत्राटदाराकडून दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:46 AM2018-10-22T00:46:03+5:302018-10-22T00:47:34+5:30

पुर्णा ते लक्ष्मीनगर यादरम्यानचा १९ कोटी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता दबल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबधित कंत्राटदाराने तातडीने या रस्त्याची डागडूगजी केली आहे.

Parbhani: Corrected road contractor repair | परभणी : दबलेल्या रस्त्याची कंत्राटदाराकडून दुरूस्ती

परभणी : दबलेल्या रस्त्याची कंत्राटदाराकडून दुरूस्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): पुर्णा ते लक्ष्मीनगर यादरम्यानचा १९ कोटी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता दबल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबधित कंत्राटदाराने तातडीने या रस्त्याची डागडूगजी केली आहे.
सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झालेला लक्ष्मीनगर ते पूर्णा हा रस्ता जागोजागी दबला होता. दबलेल्या रस्त्यामुळे सुसाट वेगात असलेल्या वाहनातील प्रवाशांना गचक्यांचा त्रास सहन करावा लागत होता. विशेष बाब म्हणजे, या रस्त्यावरील नव्याने बांधकाम केलेल्या नळकांडी पुलावर अधिक रस्ता दबला होता. केंद्रीय रस्ते निधीतून या रस्त्याच्या १०.६ कि.मी. कामासाठी शासनाकडून १९ कोटी ६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावर अनेक ठिकाणी लहान स्वरुपाची खड्डे होते. तसेच अनेक भागात रस्ता दबला होता.
रस्त्यावरील गचक्यांमुळे वाहनचालकांना शारीरिक इजा व लहान अपघातांनाही सामोरे जावे लागत होते. वाहनचालकांची होणारी अडचण लक्षात घेता १४ आॅक्टोबर रोजी ‘सहा महिन्यातच दबला रस्ता’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होेते.
या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार संबधित कंत्राटदाराकडून रस्त्याची वरवरून मलमपट्टी करण्यात येत आहे. यामुळे वाहनधारकांना तात्पुरत्या स्वरुपाचा दिलासा मिळाला असला तरी नव्याने बांधकाम केलेल्या नळकांडी पुलावरील रस्ता दबलेलाच दिसत आहे. भविष्यात या नळकांडी पुलाचा भाग कायमस्वरुपी चांगला राहिल की नाही? याबाबत शंका आहे.
पूर्णा-नांदेड : रस्त्यावर खड्डेच खड्डे
४पूर्णा-परभणीकडे जाणाºया रस्त्याच्या नुतनीकरणानंतर या रस्त्याचा प्रश्न निकाली लागला असला तरी पूर्णा ते नांदेड या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरील काही भाग वगळता रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती झाली आहे. शहरापासूनच खड्ड्यंना सुरुवात होत असून, हे खड्डे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दर वर्षी लाखो रुपये खर्च केले जातात; परंतु, काही महिन्यातच रस्त्यावरील खड्डे उघडे पडतात.
४पूर्णा-झिरोफाटा रस्त्या प्रमाणे पूर्णा ते पिंपळगाव भत्यापर्यंत या रस्त्याचे नुतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. पूर्णा ते लक्ष्मीनगर या दहा कि.मी. रस्त्यासाठी तब्बल १९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यामुळे हा रस्ता दर्जेदार होईल, अशी अपेक्षा नाागरिकांमध्ये होती; परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाला दुुर्लक्षामुळे सहा महिन्यातच या रस्त्याचीही दुरस्ती करावी लागत आहे.

Web Title: Parbhani: Corrected road contractor repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.