परभणी : चिमुकलीस पळविणाऱ्या आरोपीस चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:08 AM2018-10-19T00:08:20+5:302018-10-19T00:08:57+5:30

घरासमोर खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीस उचलून घेऊन पळून जाणाºया आरोपीला मुलीच्या मातेच्या सतर्कतेमुळे युवकांनी पकडून चांगलाच चोप दिला़ ही घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वसमत रोडवरील शिवरामनगर येथे घडली़ या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़

Parbhani: Chupchukis fleeing the accused | परभणी : चिमुकलीस पळविणाऱ्या आरोपीस चोप

परभणी : चिमुकलीस पळविणाऱ्या आरोपीस चोप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : घरासमोर खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीस उचलून घेऊन पळून जाणाºया आरोपीला मुलीच्या मातेच्या सतर्कतेमुळे युवकांनी पकडून चांगलाच चोप दिला़ ही घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वसमत रोडवरील शिवरामनगर येथे घडली़ या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- शहरातील वसमत रस्त्यावर आऱआऱ पेट्रोल पंपाच्या समोर शिवरामनगरात ही घटना घडली. १७ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एक महिला अंगणात उभी होती आणि काही अंतरावरच त्यांची अडीच वर्षांची मुलगी खेळत होती़ याच दरम्यान, लुंगी घातलेला एक माणूस त्या ठिकाणी आला़ या व्यक्तीने अंगणात खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या मुलीला उचलले आणि तो पळून जाण्याच्या स्थितीत असतानाच तिच्या आईचे लक्ष गेले़ त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्यानंतर परिसरात असलेल्या युवकांनी आरोपीचा पाठलाग करून त्यास पकडले़ बालिकेचे अपहरण करणाºया या आरोपीला बेदम चोप दिल्यानंतर रात्री उशिरा नवा मोंढा पोलिसांकडे त्यास सुपूर्द करण्यात आले़ या आरोपीचे नाव द्वारकासिंह बहात्तरसिंग पाटले (३५) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली़ या प्रकरणी द्वारकासिंह पाटले (रा़ अनुपपूर मध्यप्रदेश) याच्याविरूद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात अपहरण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस उपनिरीक्षक गिते तपास करीत आहेत़

Web Title: Parbhani: Chupchukis fleeing the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.