परभणी : रोडे खून प्रकरणात आणखी एका आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:39 AM2019-04-22T00:39:13+5:302019-04-22T00:39:36+5:30

येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी १९ एप्रिल रोजी एका आरोपीस अटक केली असून आणखी एक आरोपी हाती लागला असल्याची माहिती मिळाली आहे.

Parbhani: Another accused arrested in the murder case of Rode | परभणी : रोडे खून प्रकरणात आणखी एका आरोपीस अटक

परभणी : रोडे खून प्रकरणात आणखी एका आरोपीस अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी १९ एप्रिल रोजी एका आरोपीस अटक केली असून आणखी एक आरोपी हाती लागला असल्याची माहिती मिळाली आहे.
येथील जायकवाडी परिसरात ३१ मार्च रोजी सकाळी अमरदीप रोडे यांचा खून झाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर किरण डाके व रवि गायकवाड हे दोघे स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर पोलिसांनी एका महिला आरोपीसह अन्य एका आरोपीस ताब्यात घेतले होते. दरम्यान, १९ एप्रिल रोजी सौरभ ऊर्फ सोन्या भराडे यास पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच रविवारीही आणखी एका आरोपीस अटक करण्याची कारवाई सुरु होती.

Web Title: Parbhani: Another accused arrested in the murder case of Rode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.