परभणी: बंधारा गेट दुरुस्तीसाठी प्रशासनाला मिळेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:46 AM2019-06-27T00:46:08+5:302019-06-27T00:46:28+5:30

तालुक्यातील ढालेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे उभारण्यात आलेल्या उच्च पातळीच्या बंधाऱ्यात पाणी अडविले जाते. पावसाळ्यापूर्वी या बंधाºयाच्या गेटची दुरुस्ती करणे गरजेचे असताना मनुष्यबळाअभावी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोठा पाऊस झाला तर गेट उचलण्यास अडचणी निर्माण होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Parbhani: The administration has got the help of the Bandra Gate Amendment | परभणी: बंधारा गेट दुरुस्तीसाठी प्रशासनाला मिळेना मुहूर्त

परभणी: बंधारा गेट दुरुस्तीसाठी प्रशासनाला मिळेना मुहूर्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): तालुक्यातील ढालेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे उभारण्यात आलेल्या उच्च पातळीच्या बंधाऱ्यात पाणी अडविले जाते. पावसाळ्यापूर्वी या बंधाºयाच्या गेटची दुरुस्ती करणे गरजेचे असताना मनुष्यबळाअभावी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोठा पाऊस झाला तर गेट उचलण्यास अडचणी निर्माण होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
जलसंपदा विभागाकडून गोदावरी नदीच्या पात्रात बांधण्यात आलेल्या ११ बंधाºयापैकी पाथरी तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल येथे उच्चपातळीच्या २ बंधाºयात २०१२ पासून पाणी अडविण्यात येते. त्याच बरोबर तारूगव्हाण येथील बंधारा अद्यापही अपूर्णच असल्याने या बंधाºयात पाणी आडले नाही. मुदगल बंधाºयाची पाणी क्षमता ११.४८ दलघमी तर ढालेगाव बंधाºयाची पाणी क्षमता १४.८७ दलघमी एवढी आहे. लघु पाटबंधारे उपविभाग गंगाखेड अंतर्गत असलेल्या दोन्ही बंधाºयाच्या पाणी साठ्याचे जायकवाडी विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले आहे.
या वर्षी मार्च महिन्यातच या दोन्ही बंधाºयाचे पाणी पूर्ण आटल्याने बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. बंधाºयाच्या देखभाल दुरुस्तीचे लघु पाटबंधारे विभाग काम पाहतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी बंधाºयाच्या गेटच्या दुरुस्तीची कामे करणे आवश्यक असते. गतवर्षी पावसाळ्या पूर्वीच ढालेगाव बंधाºयाच्या गेटसाठी आॅईलिंग ग्रिसींगची कामे न केल्यामुळे पूर आल्यानंतर गेट खाली वर होत नसल्याचा प्रकार घडला होता. वास्तविक पाहता या दोन्ही बंधाºयाच्या गेटची संपूर्ण दुरुस्ती जून पूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र जून संपला तरी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. पर्यायाने एखादा मोठा पाऊस पडून पूर आल्यास धोका निर्माण होऊ शकतो. लघु पाटबंधारे विभाग परभणीच्या वतीने यांत्रिकी विभाग औरंगाबाद यांच्याकडून बंधाºयाचे गेट खाली-वरती करणे, ग्रिसींग आॅईलिंग करण्याचे काम हाती घेतले जाणार होते. मात्र मनुष्यबळाचा अभाव असल्याने त्यास अद्याप मुहूर्त मिळाला नाही. दरम्यान, गतवर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना पाण्याचे महत्त्व शेतकऱ्यांसह नागरिकांना कळले; परंतु, अद्यापही ज्या विभागाकडून या बंधाºयावर लक्ष ठेवल्या जाते. त्याच विभागाला अद्यापही बंधाºयाच्या गेटची दुरुस्ती करण्यासाठी जाग आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बंधाºयाच्या गेटची दुुुरुस्ती करण्यासाठी जलसंपदा विभागाला आदेशित करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तारुगव्हाणच्या बंधाºयात पाणी अडणार का?
च्ढालेगाव आणि मुदगल बंधाºया दरम्यान, तारूगव्हाण येथे बंधारा मंजूर करण्यात आला होता. मागील १० वर्षापासून या बंधाºयाचे काम सुरू आहे. निधीअभावी अनेक वेळा बंधाºयाचे काम बंद पडले होते. यावर्षी पुन्हा काम सुरू झाले असले तरी सप्टेंबर अखेर पाणी अडले जाणार का? असा प्रश्न आहे.
गत वर्षी पावसाच्या पाण्याने पात्रात पूर येऊन एका रात्रीत बंधारा भरला होता. पाणी सोडण्यासाठी गेट उचलण्यात येत असताना दुरुस्तीची कामे झाली नसल्याने ढालेगाव बंधाºयाचे काही गेट उचलली जात नसल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे धोका ही निर्माण झाला होता. यावर्षी बंधाºयाच्या गेट दुरुस्तीचे काम वेळेत होणे अपेक्षित होते; परंतु, अद्यापही झाले नसल्याने धोका कायम आहे.
-बंडू पाटील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष, राकॉँ.
पावसाळ्या पूर्वी बंधाºयाच्या गेटसाठी टेस्टिंग करण्यात आली आहे. गेट सध्या व्यवस्थित आॅपरेट होत आहेत. तसेच औरंगाबाद यांत्रिक विभागाकडे दुरुस्तीसाठी पत्र व्यवहार सुरू असून ४ ते ५ दिवसांत हे काम हाती घेतले जाणार आहे.
-व्ही.व्ही. नखाते,
कार्यकारी अभियंता
लघु पाटबंधारे विभाग, परभणी
च्ढालेगाव व मुदगल बंधाºयातील पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी या बंधाºयाच्या गेटची दुरुस्ती होणे आवश्यक आहे; परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने लघू पाटबंधारे विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Web Title: Parbhani: The administration has got the help of the Bandra Gate Amendment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.