परभणी : सौर कृषीपंपासाठी जिल्ह्यात ३ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:23 AM2019-02-18T00:23:23+5:302019-02-18T00:23:36+5:30

महावितरणच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार १५८ शेतकºयांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी ४२ शेतकºयांनी प्रत्यक्ष पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत शेतकºयांना लवकरच सौर कृषीपंप उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील विजेची समस्या लक्षात घेऊन राज्य शासनाने सौर ऊर्जेद्वारे चालणारे कृषीपंप उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

Parbhani: 3 thousand applications in the district for solar farming | परभणी : सौर कृषीपंपासाठी जिल्ह्यात ३ हजार अर्ज

परभणी : सौर कृषीपंपासाठी जिल्ह्यात ३ हजार अर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: महावितरणच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार १५८ शेतकºयांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी ४२ शेतकºयांनी प्रत्यक्ष पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत शेतकºयांना लवकरच सौर कृषीपंप उपलब्ध होणार आहेत.
ग्रामीण भागातील विजेची समस्या लक्षात घेऊन राज्य शासनाने सौर ऊर्जेद्वारे चालणारे कृषीपंप उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
या योजनेंतर्गत ज्या शेतकºयांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे. तसेच कृषीपंपासाठी वीज जोडणी घेतली नाही, अशा शेतकºयांना सौर कृषीपंप योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.
या योजनेत परभणी जिल्ह्यातील ३ हजार १५८ शेतकºयांनी अर्ज केले असून ३४२ शेतकºयांना कोटेशन देण्यात आले आहे. तर ४२ शेतकºयांनी त्यांच्या हिस्याची रक्कम महावितरणकडे जमा केली आहे.
महावितरणच्या वतीने मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनेच्या निविदा प्रक्रियेला शासनाने मंजुरी दिली आहे. या निविदेद्वारे निश्चित झालेली कृषीपंपाची ३ एचपी डीसीसाठी १ लाख ६५ हजार ५९४ रुपये, ५ एचपी डीसीसाठी २ लाख ४७ हजार १०६ रुपये मंजूर करण्यात आले आहे. ही रक्कम पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याने शेतकºयांना फायदा होणार आहे.
पूर्वी ३ एचपी डीसी पंपासाठी २ लाख ५५ हजार आणि ५ एचपी डीसी पंपासाठी ३ लाख ८५ हजार लागत होते. या योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी ३ एचपीसाठी २५ हजार ५०० रुपये, अनुसूचित जाती-जमाती गटासाठी लाभार्थ्यांना १२ हजार ७२५ रुपये रक्कम भरावी लागत होती. आता अनुक्रमे १६ हजार ५६० रुपये व ८ हजार २८० रुपये ही रक्कम भरावी लागत आहे. ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी लाभार्थ्यांना पूर्वी ३८ हजार ५०० रुपये तर अनुसूचित जाती जमातीसाठी गटातील लाभार्थ्यांना १९ हजार २५० रुपये एवढी रक्कम भरावी लागत होती. ती आता अनुक्रमे २४ हजार ७१० रुपये व १२ हजार ३५५ रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे. कृषी सौरपंप उपलब्ध झाल्यानंतर शेतकºयांचा शेती पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकºयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीज जोडणी घेतलेल्या शेतकºयांनाही लाभ
महावितरण आपल्या दारी योजनेत लाभार्थ्यांना वीज जोडणीचा लाभ दिला जाणार आहे. ज्या शेतकºयांनी वीज जोडणीसाठी पैसे भरुनही त्यांची वीज जोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकºयांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. राज्यात ६४ हजार ९३८ शेतकºयांनी अर्ज केले असून त्यापैकी १७ हजार १६ शेतकºयांना कोटेशन दिले असल्याची माहिती महावितरणने दिली.
शेतकºयांचा होणार फायदा
४जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विजेची मागणी वाढत चालली असून अशा काळात कृषीपंपाचा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे अनेक शेतकºयांना वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर रात्र जागून पिकांना पाणी द्यावे लागते. दिवसा सौर ऊर्जेवर चालणारा पंप शेतकºयांकडे असेल तर वीज प्रवाह खंडित झाल्यानंतरही पिकांना पाणी देणे शक्य होणार आहे. त्यामुळे या योजनेचा शेतकºयांना लाभ होणार आहे.

Web Title: Parbhani: 3 thousand applications in the district for solar farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.