परभणी : वक्फ बोर्डाच्या संपत्तीत २४७ मालमत्तांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:58 PM2019-01-02T23:58:05+5:302019-01-02T23:58:41+5:30

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून या सर्वेक्षणाअंती बोर्डाच्या मालमत्तेत २४७ मालमत्तांची भर पडली असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. आता या मालमत्तांविषयी दावे, हरकती मागविले जाणार असून, त्यानंतर मालमत्तांची राजपत्रात अंतिम नोंद घेतली जाणार आहे.

Parbhani: 247 properties in Waqf board property | परभणी : वक्फ बोर्डाच्या संपत्तीत २४७ मालमत्तांची भर

परभणी : वक्फ बोर्डाच्या संपत्तीत २४७ मालमत्तांची भर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून या सर्वेक्षणाअंती बोर्डाच्या मालमत्तेत २४७ मालमत्तांची भर पडली असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. आता या मालमत्तांविषयी दावे, हरकती मागविले जाणार असून, त्यानंतर मालमत्तांची राजपत्रात अंतिम नोंद घेतली जाणार आहे.
राज्यात वक्फ बोर्डाच्या मालकीची संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्याची नोंद १९७५ च्या राजपत्रात आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या संपत्तीचे सर्वेक्षण झाले नसल्याने ही मालमत्ता कोणत्या अवस्थेत आहे, या मालमत्तांची सध्याची स्थिती, ती कोणाच्या ताब्यात आहेत, याची एकत्रित माहिती राज्य शासनाकडे उपलब्ध नाही. अनेक मालमत्तांवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे या सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. राज्यात परभणी जिल्ह्यात या बोर्डाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याने प्रायोगिक तत्त्वावर परभणी आणि पुणे जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ७ डिसेंबर २०१६ रोजी भूमि अभिलेख विभागाच्या संचालकांना वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी, जमाबंदी आयुक्त, जिल्हा प्रशासनातील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात झाली. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनी आणि मालमत्तांचा शोध घेऊन या मालमत्तांची प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली. अ, ब व क अशा तीन गटात मालमत्तांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यात अ गटामध्ये चौरस फूट आकारातील मालमत्ता आणि ब व क गटात एकरामध्ये मोजल्या जाणाऱ्या मालमत्तांचा समावेश करण्यात आला.
सर्वेक्षणापूर्वी परभणी जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या मालकी हक्कात जिल्ह्यातील विविध भागात ११०० मालमत्तांची नोंद होती. आता हे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून, या सर्व्हेक्षणात १३४७ मालमत्तांची नोंद झाली आहे. याचाच अर्थ २४७ मालमत्ता सर्वेक्षणात नव्याने आढळल्या आहेत. त्यामुळे नव्याने आढळलेल्या या मालमत्तांविषयी लवकरच नागरिकांकडून दावे आणि हरकती मागविल्या असून, या मालमत्तांची यादी प्रत्येक तहसील कार्यालयात डकविण्यात आली आहे. त्यानंतर वक्फ बोर्डाच्या मालकीच्या या मालमत्तांची नोंद राजपत्रात घेतली जाणार आहे.
सर्वेक्षणात आल्या अनेक अडचणी
४अनेक वर्षानंतर जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे सर्वेक्षण केल्यानंतर अधिकारी, कर्मचाºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनी कुठे आहेत, किती आहेत, याची माहिती देण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याने या जमिनी शोधण्यात बराच कालावधी खर्ची घालावा लागला. १९७५ च्या राजपत्रात असलेल्या नोंदणी आणि नवीन नूतणीकरण केलेल्या मालमत्ता याचा आधार घेऊन हे सर्व्हेक्षण करण्यात आले.
साडेपाच हजार एकराची मालकी
जिल्ह्यातील दर्गाह, मशीद, कब्रस्तान, आशूरखाने, ईदगाह, धर्मशाळा आदींसाठी वक्फ बोर्डाच्या जागेचा वापर केला जातो. काही जमिनी इनामी म्हणूनही दिलेल्या आहेत. जिल्ह्यात ११०० मालमत्तांबरोबरच वक्फ बोर्डाच्या मालकीची एकूण सुमारे ३३१ सर्व्हे नंबरमध्ये ५८२१ एक्कर शेत जमीन असल्याचेही या सर्वेक्षणात पुढे आले आहे.

Web Title: Parbhani: 247 properties in Waqf board property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.