परभणीच्या महापौरपदी काँग्रेसच्या मीनाताई वरपूडकर

By Admin | Published: May 16, 2017 02:34 PM2017-05-16T14:34:41+5:302017-05-16T14:34:41+5:30

परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या मीनाताई वरपूडकर तर उपमहापौरपदी स. समी उर्फ माजू लाला यांची निवड करण्यात आली आहे.

Meenatai Warpudkar of Parbhani's Mayor, Congress | परभणीच्या महापौरपदी काँग्रेसच्या मीनाताई वरपूडकर

परभणीच्या महापौरपदी काँग्रेसच्या मीनाताई वरपूडकर

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 16 - परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या मीनाताई वरपूडकर तर उपमहापौरपदी स. समी उर्फ माजू लाला यांची निवड करण्यात आली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला पाठिंबा दिला तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा पराभव केला. 
 
परभणी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी मंगळवारी बी रघुनाथ सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी घेण्यात आलेल्या मतदानात काँग्रेसच्या मीनाताई सुरेश वरपूडकर यांना ४० मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार शेख आलिया अंजूम म. गौस यांना १८ मते मिळाली. भाजपाच्या ८ सदस्यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. शिवसेनेचा ६ पैकी एकच सदस्य सभागृहात हजर होता. तोही तटस्थ राहिला.
 
उर्वरित शिवसेनेचे ५ सदस्य सभागृहात आले नाहीत तर राष्ट्रवादीचा एक सदस्य गैरहजर राहिला. मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी काँग्रेसच्या मीनाताई वरपूडकर यांना २२ मतांनी विजयी घोषित केले.
 
उपमहापौर पदाची निवडणूक मात्र एकतर्फीच झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे स़समी उर्फ माजू लाला यांना ३२ मते मिळाली तर भाजपाच्या डॉ. विद्या पाटील यांना ८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने तटस्थतेची भूमिका घेतली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिका-यांनी काँग्रेसचे स.समी यांना २४ मतांनी विजयी घोषित केले. या निवडणुकीत भाजपाची भूमिका सर्वांनाच संभ्रमात टाकणारी ठरली. महापौर पदासाठी काँग्रेसला समर्थन देणाºया भाजपाचा उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने दारूण पराभव केला.
 
 स. समी उर्फ माजू लाला
 

Web Title: Meenatai Warpudkar of Parbhani's Mayor, Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.