शेतकऱ्यांसाठी महत्वाचे; विद्यापीठात विकसित रोगप्रतिकारक, लवकर येणाऱ्या ७ वाणांची शिफारस

By मारोती जुंबडे | Published: February 9, 2024 01:32 PM2024-02-09T13:32:26+5:302024-02-09T13:34:00+5:30

राज्य बियाणे उपसमितीची बैठक; शेती पिकांचे पाच, भाजीपाल्याच्या दोन वाणाचा समावेश

Important for farmers; State Seed Committee recommendation for disease resistant, early maturing 7 variety | शेतकऱ्यांसाठी महत्वाचे; विद्यापीठात विकसित रोगप्रतिकारक, लवकर येणाऱ्या ७ वाणांची शिफारस

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे; विद्यापीठात विकसित रोगप्रतिकारक, लवकर येणाऱ्या ७ वाणांची शिफारस

परभणी: राज्य बियाणे उपसमितीची ५३ वी बैठक ८ फेब्रुवारी रोजी राज्याचे अप्पर मुख्य सचिव (कृषि) अनुप कूमार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या शेती पिकांचे पाच वाण आणि भाजीपाला पिकांचे दोन वाण अशा एकूण सात वाणास केंद्रीय बियाणे समिती यांना अधिसूचित करण्याची शिफारस करण्यात आली. 

या सात वाणात सोयाबीनचे एमएयुएस ७३१, अमेरिकन कापूसाच्या एनएच ६७७, हरभरा देशी वाण परभणी चना १६, खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती, तीळ पीकाच्या टिएलटी १० तसेच मिरचीचा पीबीएनसी १७ व टोमॅटोचा सरळ वाण पीबीएनटी २० याचा समावेश आहे. सोयाबीनचा एमएयुएस ७३१ हा वाण अधिक उत्पन्न देणारा (हेक्टरी २८ - ३२ क्विंटल) असून विविध कीड रोगास मध्यम प्रतिकारक, लवकर येणारा, मराठवाडा विभागासाठी लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.

अमेरिकन कापूस प्रसारित वाण एनएच ६७७ यांचे जिराईत मधील उत्पादन क्षमता हेक्टरी १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टर काढणीचा कालावधी १५० ते १६० दिवस आहे, हा वाण जिवाणूजन्य तसेच बुरशीजन्य रोग व रस शोषणाऱ्या किडीस प्रतिकारक आहे. हे वाण महाराष्ट्र राज्यातील कोरडवाहु कापूस लागवड असलेल्या भागासाठी शिफारसीत करण्यात आला आहे. हे वाण बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी उपयूक्त ठरणार आहेत. हे सात वाण प्रसारण करण्यासाठी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर व विद्यापीठातील पीक पैदासकारांचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी सत्कार केला.

परभणी चना १६
हरभरा देशी वाण हा अधिक उत्पन्न देणारा, मर रोगास प्रतिकारक, यांञिकीसाठी सुलभ, टपोऱ्या दाण्याचा, मराठवाडा विभागासाठी शिफारसीत करण्यात आला आहे.

टिएलटी १०
तीळ पीकात हा अधिक उत्पन्न देणारा टपोरा पांढरा दाणा, महत्वाच्या किड व रोगास मध्यम प्रतिकारक असुन महाराष्ट्रासाठी खरीप व उन्हाळी हंगामास लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.

परभणी शक्ती
ज्वारीचा खरीप हंगामातील परभणी शक्ती हा वाण धान्यामध्ये अधिक लोह (४२ मिली ग्रॅम / किलो) व अधिक जस्त (२५ मिली ग्रॅम / किलो) असणारा व धान्याचे उत्पादन २२ ते २५ Ïक्वटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता आहे. कडब्याचे ५२ ते ५५ क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता असणारा वाण महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामात लागवडीची शिफारस करण्यात आला आहे.

मिरची पीबीएनसी १७ 
मिरचीचा पीबीएनसी १७ हा वाण हिरवी मिरचीचे अधिक उत्पादन देणारा ५३१ ते ५४६ क्विंटल प्रति हेक्टर, मराठवाडा विभागासाठी खरीप हंगामामध्ये लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. हा वाण लिफकर्ल व अॅथ्राकनोझ रोगास मध्यम सहनशील आहे.

पीबीएनटी २० 
टोमॅटोचा सरळ वाण पीबीएनटी २० हा वाण रब्बी हंगामामध्ये मराठवाडा विभागास लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. या वाणाची उत्पादन क्षमता ६१४ ते ६२० क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. या वाणाच्या फळाचा आकार गोल व गडद्द लाल रंग असुन प्रति फळाचे वजन ६० ते ६५ ग्रॅम आहे. लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी फळाची पहिली काढणीस येते. हा वाण लिफकर्ल व फळामधील अळी, पांढरी माशी व फुल किडे या किडीस मध्यम सहनशील आहे.

Web Title: Important for farmers; State Seed Committee recommendation for disease resistant, early maturing 7 variety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.