राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्ती विटबंनेच्या निषेधार्थ गंगाखेड येथे कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 03:30 PM2019-01-16T15:30:37+5:302019-01-16T15:37:07+5:30

यामुळे येथील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत़ 

Gangakhed Bandha against Bhagwanbaba statue vandalism | राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्ती विटबंनेच्या निषेधार्थ गंगाखेड येथे कडकडीत बंद

राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्ती विटबंनेच्या निषेधार्थ गंगाखेड येथे कडकडीत बंद

Next

गंगाखेड ( परभणी )- राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची अहमदनगर जिल्ह्यात विटबंना झाल्याच्या निषेधार्थ शहरात आज सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे येथील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत़ 

अहमदनगर जिल्ह्यातील भळवणी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटबंना झाल्याचा प्रकार घडला होता़ या घटनेचा निषेध करण्यासाठी व सदरील आरोपींना कठोर शासन करावे, या मागणीसाठी बुधवारी गंगाखेड बंदचे आवाहन करण्यात आले होते़ संत भगवान बाबा यांच्या भक्तांनी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील भगवती चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढला़ हा मूक मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ दरम्यान, शहरातील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.

Web Title: Gangakhed Bandha against Bhagwanbaba statue vandalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.