जिंतूरात संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब; पाच गावाचा संपर्क तुटला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 06:55 PM2018-08-21T18:55:34+5:302018-08-21T18:55:59+5:30

तीन दिवसांपासून  तालुक्यात सतत धार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत. पावसामुळे तालुक्यातील तलाव  सिंचन तलाव व पाझर तलाव भरले आहेत.

Due to the continuous rains in Jintu, the rivers and tributaries; Five villages lost contact | जिंतूरात संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब; पाच गावाचा संपर्क तुटला 

जिंतूरात संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब; पाच गावाचा संपर्क तुटला 

googlenewsNext

जिंतूर (परभणी)  : तीन दिवसांपासून  तालुक्यात सतत धार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत. पावसामुळे तालुक्यातील तलाव  सिंचन तलाव व पाझर तलाव भरले आहेत. बळीराजा ही या पावसामुळे समाधानी आहे. असे असले तरी येलदरी व सिद्धेश्वर धरणामध्ये अद्याप पाणीसाठा  नसल्याने भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी  मोठ्या पावसाची गरज आहे. 

तालुक्यामध्ये मागील तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने तालुक्यातील अनेक नद्यांना पूर आला. पाचलेगाव येथील नदीला पूर आल्याने पाचलेगाव, चिंचोली, चिंचोली तांडा, निवळी खुर्द, कडसावंगी या गावाचा संपर्क मागील २४ तासांपासून तुटलेला आहे. तसेच तालुक्यातील इटोली, बामणी, जोगवाडा येथील नद्यांना पूर आल्याने जीवन विस्कळीत झाले आहे.

Web Title: Due to the continuous rains in Jintu, the rivers and tributaries; Five villages lost contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.