परभणी लोकसभा मतदार संघात ७३३६ पोस्टल मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:58 PM2019-03-15T23:58:28+5:302019-03-15T23:58:55+5:30

परभणी लोकसभा मतदारसंघात सैन्यदलात सेवेत असलेले १ हजार ३२० जवान तर निवडणुकीच्या कामात कार्यरत असलेले ६ हजार १६ कर्मचारी असे एकूण ७ हजार ३३६ पोस्टल मतदार आहेत.

7336 postal voters in Parbhani Lok Sabha constituency | परभणी लोकसभा मतदार संघात ७३३६ पोस्टल मतदार

परभणी लोकसभा मतदार संघात ७३३६ पोस्टल मतदार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात सैन्यदलात सेवेत असलेले १ हजार ३२० जवान तर निवडणुकीच्या कामात कार्यरत असलेले ६ हजार १६ कर्मचारी असे एकूण ७ हजार ३३६ पोस्टल मतदार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर १९ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. १८ एप्रिल रोजी परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून या मतदानाची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. या अनुषंगाने परभणी लोकसभा मतदारसंघातील पोस्टल मतदारांची माहिती घेतली असता मतदारसंघात एकूण ७ हजार ३३६ मतदार पोस्टल असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले. यामध्ये सैन्यातील १ हजार ८० मतदार परभणी जिल्ह्यातील तर २४० मतदार घनसावंगी आणि परतूर विधानसभा मतदारसंघातील आहेत. ६ विधानसभा मतदारसंघात एकूण १ हजार ३२० सैन्यदलात कार्यरत मतदार आहेत. या मतदारांची यादी निवडणूक आयोगाकडून सैन्यदलातील रेकॉर्डिंग आॅफीसरमार्फत पाठविली जाते. त्यानंतर सैन्यदलातील वरिष्ठांच्या पडताळणीनंतर वेबसाईटवरुन मतपत्रिका डाऊनलोड करुन घ्यावी लागणार आहे. त्यानंतर सदरील मत पत्रिकेवर मतदान करुन ती पोस्टाने परभणी येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवावी लागणार आहे. याशिवाय निवडणुकीच्या कामानिमित्त विविध ठिकाणी नियुक्त पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांनाही पोस्टल मतदान करता येणार आहे. या कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाकडून पूर्वीच मतपत्रिका दिली जाते. त्यानंतर हे कर्मचारी मतदान करुन पोस्टाने आपली मतपत्रिका निवडणूक विभागाला पाठवून देतात, असे परभणी लोकसभा मतदारसंघात ६ हजार १६ मतदार आहेत.
तीन नोडल अधिकाºयांची नियुक्ती
४लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एखाद्या संशयास्पद हालचालीसंदर्भात माहिती देण्यासाठी तीन नोडल अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये आयकर विभागाचे सहाय्यक नोडल अधिकारी स्वप्नील सावंत (९९७५९७२३०४/ ७५८८१८२१८१), पडताळणी अधिकारी मनोज करगीळकर (७५८८१८१३८७) आणि नवीनकुमार (७५८८१८१९३१/ ९६३७५८२२४३) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक खर्च विभागाचे नोडल अधिकारी यांनी कळविली आहे.

Web Title: 7336 postal voters in Parbhani Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.