जरा प्रॅक्टिकल विचार कराच.

By Admin | Published: May 28, 2015 03:22 PM2015-05-28T15:22:02+5:302015-05-28T15:22:02+5:30

प्रश्नांच्या आणि पत्रंच्या ढिगातून निवडलेले बहुसंख्य दोस्तांच्या मनातले प्रश्न आणि त्यांच्या रोखठोक उत्तरांनी सजलेला हा विशेष अंक.

Think of a practical idea. | जरा प्रॅक्टिकल विचार कराच.

जरा प्रॅक्टिकल विचार कराच.

googlenewsNext

 प्रश्नांच्या आणि पत्रंच्या ढिगातून निवडलेले बहुसंख्य दोस्तांच्या  मनातले प्रश्न  आणि त्यांच्या

रोखठोक उत्तरांनी सजलेला हा विशेष अंक.
 
 
 
तुमच्या करिअरच्या प्रश्नांना ‘प्रॅक्टिकल’ उत्तरं देणारा एक विशेष अंक
 
‘ऑक्सिजन’च्या करिअर स्पेशल सिरीजमधला
हा समारोपाचा अंक.
तुमच्या मनातल्या अनेक अवघड प्रश्नांची उत्तरं देणारा एक विशेष अंक.
करिअर स्पेशलची ही मालिका सुरू करतानाच ‘ऑक्सिजन’ने वाचक मित्रमैत्रिणींना विचारलं होतं की,
तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला विचारा.
कितीही सामान्य वाटला आपला प्रश्न तरीही विचारा, निर्णय घेता येणं अवघड झालं असेल तर ते विचारा, एखाद्या टप्प्यावर अडला असाल, कन्फ्युजन असेल डोक्यात तर तेही बिंधास्त विचारा असं म्हणत ऑक्सिजन टीमने वाचक मित्रमैत्रिणींना प्रश्न पाठवण्याचं आवाहन केलं होतं.
ढिगानं प्रश्न आले. अनेक प्रश्नांत तर आपण घेतलेल्या निर्णयाच्या कहाण्या होत्या, आपली स्वप्नं होती. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची आणि त्यामुळे आपलं करिअर बरबाद होत असल्याची तक्रारही होती.
एक विशेष म्हणजे, यावेळेस वाचक दोस्तांनी मी कशात करिअर करू हे विचारलं नाही. म्हणजे नवीन वाटा सांगा, किंवा नर्स व्हायचंय, कंडक्टर व्हायचंय इथपासून ते परदेशी शिकायला जायचंय तर काय करू इथर्पयत, असे सल्ले मागितले नाही. माहिती विचारली नाही.
बहुतांश प्रश्न आले ते निर्णयाविषयी असलेल्या गोंधळाचे. आपण योग्य रस्त्यावर आहोत की नाही याची खात्री करून घेणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अॅटिटय़ूडचे!
अनेकांना हेच माहिती नाही की, आपण डिप्लोमा करावं डिग्री, स्पर्धा परीक्षा द्याव्यात तर आपण टिकू का? काहींना आपण जे शिकतोय तेच आवडत नाही, तर काहींना काहीतरी मनासारखं करायचंय पण ते ‘मनासारखं’ म्हणजे काय हेच माहिती नाही. त्यात थोडं ग्लॅमरही वाटतं, बंड पुकारून शिक्षण सोडून काहीतरी भलतंच करावंसं वाटतं. पण ते भलतं म्हणजे काय हेदेखील माहिती नाही.
अशा ‘माहिती नाही’ टप्प्यात अडलेले आणि अनेक गोष्टी ‘कळूनही’ टाळणारे अनेक प्रश्न या पत्रंमधे दिसले.
त्या पत्रंच्या ढिगातून मग जे प्रश्न बहुसंख्य विद्याथ्र्यानी विचारले होते, त्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा अंक आहे.
प्रत्येक पानावर तुम्हाला तुमच्या मनातले काही प्रश्न भेटतील.
आणि त्या प्रश्नांना त्या-त्या क्षेत्रतल्या तज्ज्ञांनी दिलेली प्रॅक्टिकल उत्तरंही मिळतील.
ही उत्तरं स्वप्नाळू नाहीत, काही जणांना ही उत्तरं वाचून कदाचित त्रसही होईल.
पण योग्य वाट शोधायची तर प्रॅक्टिकल उत्तराचा हात सकारात्मक विचारानं धरतच पुढे जायची वाट सापडू शकेल.
ती सापडावी म्हणून तर हा विशेष अंक.
खूप सा:या शुभेच्छांसह या वर्षाच्या या करिअर स्पेशल सिरीजचा इथेच समारोपही करत आहोत.
- ऑक्सिजन टीम
 

Web Title: Think of a practical idea.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.