गणेशोत्सव? नटण्यामुरडण्याचं काही प्लॅनिंग केलंय का?-हा घ्या फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 03:46 PM2017-08-21T15:46:27+5:302017-08-21T15:47:49+5:30

4+3+2+1=10 हा स्टायलिश फॉम्यरुला वापरून पाहा, तुमच्या स्टाईलचे चर्चे नक्की होतील!

ready for ganeshotsav? try this stylish 10 points formula | गणेशोत्सव? नटण्यामुरडण्याचं काही प्लॅनिंग केलंय का?-हा घ्या फॉर्म्युला

गणेशोत्सव? नटण्यामुरडण्याचं काही प्लॅनिंग केलंय का?-हा घ्या फॉर्म्युला

Next
ठळक मुद्देगणपतीत काय घालायचं, या प्रश्नानं डोकं शिणवण्यापेक्षा जरा नीट प्लॅन करा, छान ट्रॅडिशनल दिसा.

-ऑक्सिजन टीम

आजपासून बरोबर चार दिवसांनी, येत्या शुक्रवारी गणपती बाप्पाचं आगमन होईल. तुमच्या कॉलेजात, ऑफिसमध्ये, घरी अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींकडे, नातेवाईकांकडे गणपती असेल. गणेश चतुर्थी, गौरी पूजन ते गणपतीतला एखादा कार्यक्रम, अनंत चतुर्दशी अशा वेगवेगळ्या प्रसंगी काय घालायचं, असा प्रश्न दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्हाला सतावत असेल. तर या दहा दिवसांचं स्टाइल स्टेटमेण्ट प्लॅन करण्यासाठी या काही सोप्या गाइडलाइन्स.

ट्रेण्डी दिसणं हीच सध्या एक मोठी फॅशन आहे. त्यामुळे गणपतीच्या दहा दिवसांतही तसा फेस्टिव्ह मूड सांभाळायला हवा.

तो सांभाळायचा तर सलग दहा दिवसांचा  विचार करण्यापेक्षा 4+3+2+1=10 असा हा फॉम्यरुला प्लॅन करा.

मग बघा, तुम्ही दिसालही मस्त आणि तुमचा मूडही एकदम खुलून जाईल.!

चारवेळा काय घालायचं?

तरूण मुलांसाठी तर कुर्ते + पायजमा हे कॉम्बिनेशन असतंच, पण मुलींचा प्रश्न मोठा. त्यासाठी हा प्लॅन.

ट्रॅडिशनल साडय़ा आणि एक नऊवारी असा हा प्लॅन करा. सिल्कच्या पारंपरिक साडय़ा, त्याचे मस्त ब्राईट कलर्स असे निवडून ठेवा. कुठली साडी गणेश चतुर्दशीला, कुठली गौरींना, कुठली हळदी कुंकवाच्या दिवशी, कुठली कुणा ‘खास’च्या घरी जायचं असेल तेव्हा, असं सगळं प्लॅन करा.

या साडय़ांवर शक्यतो ट्रॅडिशनल ज्वेलरीच वापरा.

तीन दिवसांची स्टाईल

गणपती, गौरी आणि एखादा दिवस असे तीनच दिवस तुमच्यासाठी समजा महत्त्वाचे आहेत, तर तुम्हाला आवडत असतील तर तीन ट्रॅडिशनल साडय़ा किंवा तीन सिल्कचे ट्रॅडिशनल कुर्ते असं कॉम्बिनेशन ठरवा.

साडय़ांमध्ये क्रेप सिल्क, टस्सर सिल्क, शिफॉन, जॉज्रेट असे प्रकार निवडा, अनारकली किंवा एम्ब्रॉयडरीवाला चुडीदार कुर्ताही छान दिसेल.

त्यावर भरजरी दागिने घालण्याचा आटापिटा करु नका. एखादंच लांब नेकलेस किंवा फक्त लांब मोठे कानातले, ब्रेसलेट, एखादी कुडी एवढं घातलं तरी पुरे. तुम्ही दुसर्‍याच्या घरी कार्यक्रमाला जाणार असाल तर फार सजून जायची गरज नाही, आपण छान दिसल्याशी कारण, फार तामझाम टाळलेला चांगला.

दोन दिवस? छा जाओ.

असं काही फार तामझामवालं तुम्हाला नकोय. फक्त कुणाकडे तरी जायचंय. ऑफिसात किंवा कॉलेजात कार्यक्रम आहे. मूडला साजेसं फक्त काहीतरी घालायचंय. तर मग फक्त एथनिक टच असलेले कपडे घाला. कॉटन सिल्कचे कुर्ते, प्रिण्टेड चुडीदार, दुपट्टा, कॉटनची साडी असं कॉम्बिनेशन करत निवडतानाही शक्यतो लाल,  पिवळा असे रंग निवडा. सिम्पल तरी फेस्टिवल फक्त डल कलर ोवढे घालू नकाच. दागिनेही फक्त एखादं मोत्याचा मोत्याचं लहानसे कानातलं, हातात बांगडी.

शेवटचा दिवस.

हा खास अनंत चतुर्दशीचा दिवस. तुम्ही विसजर्नाला जाणार आहात फार झागरमागर कपडे घालण्यापेक्षा जरा जाडसर फॅब्रिकचे कपडे घाला. कपडे ट्रान्सफरण्ट दिसता कामा नये. सलवार कुर्ता, चुडीदार घाला. फॅशनपेक्षाही या दिवशी अन्य गोष्टी हवं. तुम्ही रस्त्यावर नाचणार असाल मोठय़ा गळ्यांचे कपडे वापरू नका. कुर्ता मापाचा, बंद गळ्याचा आहे ना हे पहा. गुलाल उधळणारे लोक, पाऊस, अनोळखी वातावरण तेव्हा डीसेन्सी सांभाळा.

Web Title: ready for ganeshotsav? try this stylish 10 points formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.