भेटा दर रविवारी गडांवर जाणार्‍या या मित्राला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 05:30 PM2018-09-28T17:30:50+5:302018-09-28T17:31:02+5:30

एखाद्या दिवशी आपण ट्रेकला जातो. भटकून येतो. पण गणेशला भेटा, तो सलग 141 रविवार नियमित गडकिल्ल्यांवर जातोय गडांचं संवर्धन आणि स्वच्छता हे त्याचं पॅशन बनलंय.

Meet Ganesh Raghuveer, a fort lover | भेटा दर रविवारी गडांवर जाणार्‍या या मित्राला.

भेटा दर रविवारी गडांवर जाणार्‍या या मित्राला.

ठळक मुद्देआठवडाभर काम आणि वीकेण्डला किल्ले हे त्याचं आयुष्यच बनून गेलं आहे

-चेतन ननावरे

दक्षिण मुंबईतील कुलाब्यासारख्या उच्चभ्रू ठिकाणी हँगआउटसाठी हजारो तरुण-तरुणी देशाच्या विविध कोपर्‍यातून येतात. येथील कार्पोरेटमध्ये काम करणारे लाखो तरुण-तरुणी सॅटर्डे नाइटला पार्टीमध्ये चिल करतात. मात्न त्याच जगात रिलेशनशिप मॅनेजरसारख्या उत्तम पदावर काम करून सुखाचं आयुष्य जगणारा एक गडकिल्लेवेडा तरुण मात्र दर रविवारी भलत्याच वाटेनं जातो. गेली अडीच वर्षे सलग राज्यातच नव्हे, तर देशातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तो भटकतो आहे. एक ना दोन, सलग 141 रविवार तो नियमित गडकिल्ल्यांवर जातोय. त्यासाठी 651 मोहिमांमध्ये तो सहभागी झाला आहे. त्याचं नाव गणेश रघुवीर.
लहानपणापासून किल्ल्यावर जाण्याची त्याला आवड होती. पण ते आपलं पॅशन होईल असं काही कधी त्याला वाटलं नव्हतं. कॉलेजात असताना अधूनमधून ट्रेकला जाण्याची संधी मिळायची. पण फक्त गड-किल्ल्यांवर जायचं आणि फोटोग्राफी करायची, एवढंच काय ते ट्रेकिंग गणेशला माहीत होते. पण 2009 साली त्याचा संपर्क सह्याद्री प्रतिष्ठानसोबत आला. सह्याद्रीचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्यासह शिवरथ यात्नेत गणेश सामील झाला. तिथं त्याला आपल्या आयुष्याला एक मार्ग सापडला. मित्नांसोबत पालखीत सामील झाल्यावर पांडुरंग बलकवडेंसह विविध वक्त्यांना ऐकण्याची संधी त्याला मिळाली. त्यातून दुर्ग संवर्धन, स्वच्छता मोहिमांत तो सामील होऊ लागला.
2010 सालापासून किल्ल्यांची माहिती घेण्यास गणेशने सुरुवात केली. रायगड जिल्ह्यातील किल्ल्यांवर फिरताना त्यांची रचना आणि बांधकाम याचा अभ्यास करताना लिखाणाला सुरुवात केली. त्यासाठी मुंबईसह पुण्यातील बर्‍याच इतिहास संशोधकांनाही तो भेटला. किल्ल्यांच्या  स्थापत्याबाबत लिहिण्यासाठी अधिकाधिक किल्ले पाहावे लागतील, हे त्याच्या लक्षात आलं. त्याप्रमाणे 2012 सालापासून त्यानं वेगवेगळे किल्ले पाहण्यास सुरुवात केली. तर 2014  सालापासून मोठय़ा संख्येने दुर्लक्षित  किल्ल्यांची पाहणी सुरू केली. 2015 साली भिवंडीतील भूमतारा किल्ल्यावर दहाहून अधिक वेळा जात त्यानं किल्ल्याचा नकाशा तयार केला. इतिहास संशोधन मंडळानं या किल्ल्याचा संशोधन लेखही त्यांच्या त्नैमासिकात प्रकाशित केला. काहीवेळा गड-किल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धनासाठी मोहीम आखल्यानंतर कुणीही सोबत नसायचं. मात्न गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी झपाटलेल्या गणेशला शांत बसावंसं वाटायचं नाही. तो एकटाच जायचा. त्यातून जानेवारी 2016 साली त्यानं सलग भ्रमंती करण्याचा संकल्प केला.
कर्जत तालुक्यातील ढाक बिहरी या किल्ल्यावरून 17 जानेवारी 2016 मध्ये सलग मोहिमेला त्यानं सुरुवात केली. त्यानंतर आजतागायत सलग 141 रविवार मोहिमा अखंडपणे सुरू आहेत. या मोहिमांत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, जळगाव अशा विविध जिल्ह्यांपासून राजस्थान, कर्नाटक, गोवा राज्यांतील किल्लेही त्यानं पाहिले. मोहिमांदरम्यान गड-किल्ल्यांवरील प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रशासनासोबत त्याचा पत्नव्यवहार सुरू असतो. एकटय़ा राजस्थानमधील 200हून अधिक किल्ले त्यानं पाहिले आहेत, तर महाराष्ट्रातील भुईकोट, जलदुर्ग, गिरीदुर्ग अशा विविध गड-किल्ल्यांचा त्याच्या मोहिमेत समावेश आहे.
याच काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोहीम राबवताना सलग पाच दिवसांत 25 किल्ले, तर सातारा जिल्ह्यातील चार दिवसांत 17 गिरीदुर्ग करण्याचा विक्रम त्यानं केला आहे. या 17  किल्ल्यांमध्ये सातार्‍यातील सदाशिव गड, सुंदर गड, कमळ गड अशा विविध गिरीदुर्गाचा समावेश आहे. सह्याद्री प्रतिष्ठानसोबत काम करताना दुर्ग संवर्धनाचे प्रमुख पद त्याला मिळालं. संघटनेच्या मदतीने आणि दुर्ग संवर्धन विभाग व राज्य आणि केंद्र पुरातत्त्व खात्याला सोबत घेऊन गणेशने मुंबई, ठाणे, रेवदंडा अशा विविध भागांमधील 40हून अधिक तोफांचं संवर्धन केलं आहे. याशिवाय पन्हाळगड ते विशालगड हा ऐतिहासिक 64 किमी अंतराचा ट्रॅक एका दिवसात एकोणीस तासात करण्याचा पराक्रम गेली तीन वर्षे तो करत आहे. रायगड किल्ल्याची 14 किलोमीटर लांबीची सर्वात जलद भ्रमंती करताना किल्ल्यावरील भवानी टोक या 700 फूट उंच व वाघ दरवाजा या 600 फूट उंचावरून कोणतेही कृत्रिम साहित्य न वापरता खाली उतरून पुन्हा वर चढण्याची किमयाही गणेशने साध्य करून दाखवली आहे.
आठवडाभर काम आणि वीकेण्डला किल्ले हे त्याचं आयुष्यच बनून गेलं आहे.  गड-किल्ल्यांचं संवर्धन करताना नोकरी किंवा कामावर कोणताही परिणाम त्यानं होऊ दिला नाही. कारण सोमवार ते शुक्र वारदरम्यान दिवसा ऑफिसचं काम, तर रात्नी गड-किल्ल्यांसंदर्भातील लिखाणाचं काम तो करत असतो. येत्या दोन वर्षात याच विषयामध्ये पीएच.डी. करण्याचाही त्याचा मानस आहे.


 

Web Title: Meet Ganesh Raghuveer, a fort lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.