कबड्डीची कॉमेण्ट्री आणि दोन बहिणी

By admin | Published: August 20, 2015 02:43 PM2015-08-20T14:43:36+5:302015-08-20T14:43:36+5:30

कबड्डी खेळलेल्या दोन खेळाडू भगिनी जेव्हा आपलाच खेळ बोलून सा:या दुनियेला समजवतात, त्यातला थरार उलगडतात, तेव्हा काय घडतं?

Kabaddi cometry and two sisters | कबड्डीची कॉमेण्ट्री आणि दोन बहिणी

कबड्डीची कॉमेण्ट्री आणि दोन बहिणी

Next
>प्रो कबड्डीच्या दुस-या सत्रला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा देशभरात सुरू झाली कबड्डीची चर्चा. पहिल्या सत्रच्या अभूतपूर्व यशानंतर दुसरे सत्रदेखील धडाक्यात होणार यात शंकाच नव्हती आणि झालेही तसेच. यंदा आयोजकांनी अनेक बदल करून ही लीग अत्यंत आकर्षक केली. ग्राफिक्स, अॅनिमेशनमुळे प्रेक्षकांना अधिक माहिती मिळाली. विशेष म्हणजे, यावेळी तब्बल पाच भाषांमध्ये प्रसारण करून अधिकाधिक प्रेक्षकांर्पयत खेळ पोहचवण्याचा प्रयत्न झाला. पहिल्यांदाच मराठी भाषेतून आकर्षक व सोप्या भाषेतील ‘लाइव्ह कॉमेण्ट्री’ ऐकायला मिळायला लागल्यानं कबड्डी ज्यांना समजत नव्हती, त्यांनाही कळायला लागली.
आणि मराठी कॉमेण्ट्रीचा आवाज बनलेल्या दोन मराठी भगिनी, त्यांचं कबड्डीचं वर्णन अनेकांना कबड्डीशी जोडत चाललंय. सामने पुरुषांचे, कॉमेण्ट्री महिला करताहेत, हा प्रयोगही वेगळाच होता.
आणि ते आव्हान पेललं, वसईच्या गौतमी राऊत-आरोसकर आणि अश्विनी राऊत-पाटील या दोन सख्ख्या बहिणींनी! स्वत: कसलेल्या राष्ट्रीय कबड्डीपटू असलेल्या या दोघी. गौतमीला तर 1998 मधे राज्य शासनाने ‘शिवछत्रपती’ पुरस्कार प्रदान करून गौरवलंदेखील आहे. कॉमेण्ट्री बॉक्समधे बसून कबड्डीचं लाइव्ह वर्णन करताना या खेळाडूंना कबड्डीचं नवं चित्र कसं दिसतंय याविषयी त्यांच्याशी या मस्त, दिलखुलास गप्पा.
 
 
कोण आहेत या 
राऊत भगिनी?
गौतमी राऊत-आरोसकर
ती स्वत: कबड्डीची राष्ट्रीय खेळाडू आहे. 1998 साली तिने बँकॉक येथे झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. शालेय व कॉलेज स्तरावर स्पर्धा गाजवल्यानंतर तिला मुंबईतील क्लबकडून संधी मिळाली. परंतु वडील नारायण राऊत यांनी मुंबईचा रोजचा लांब थकवा देणारा प्रवास टाळण्यासाठी वसईतच स्वत:चा क्लब स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्याप्रमाणो त्यांनी 24 एप्रिल 1998 रोजी ‘विवेक महिला संघ’ स्थापन केला. यासाठी त्यांना प्रशिक्षक चंद्रकांत नार्वेकर यांचे मोलाचे व महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले. नार्वेकर स्वत: मुलुंडला राहत असूनही रोज न चुकता स्थानिक खेळाडूंच्या अगोदर मैदानावर प्रशिक्षण देण्यासाठी हजर असायचे. त्यांच्यामुळेच आमच्या अंगी शिस्त व वेळेचे महत्त्व पाळण्याचा गुण आला, असे गौतमी व अश्विनी आवजरून सांगतात. तसेच आई जयंती राऊत यांनीदेखील नेहमीच प्रोत्साहन दिल्याने आज कबड्डीत यशस्वी झाल्याचे राऊत भगिनी अभिमानाने सांगतात.
शालेय जीवनापासूनच कबड्डी खेळत असलेल्या या राऊत भगिनी नेहमी मैदानावरच असल्या तरी अभ्यासाकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष कधी झाले नाही. उलट ‘टॉप स्कॉची’ कॅटेगरीतील विद्याथ्र्याप्रमाणो त्यांचा अभ्यास राहिल्याने त्यांची शैक्षणिक पात्रतेची माहिती कळताच आश्चर्य वाटते. गौतमी यांनी दहावीनंतर सायन्सचा मार्ग निवडला आणि बारावीला त्यांची मेरिट अवघ्या 6-7 मार्कानी हुकली. तसेच बारावीनंतर मेडिकलचे अॅडमिशन मिळत असतानादेखील त्यांनी कबड्डीला पसंती दिली. पुढे त्यांनी चांगल्या मार्कानी एम.एस्सी. पूर्ण करून कबड्डीतही उत्तम यश कमावलं.
 
अश्विनी राऊत-पाटील
मोठय़ा बहिणीला कबड्डी खेळताना पाहून अश्विनी आपसूक कबड्डीकडे वळली. गतवर्षी हिंदीतून कॉमेंट्रीचा अनुभव असलेल्या गौतमीकडून काही टिप्स घेऊन तिनं दणक्यात मराठी कॉमेंट्रीला सुरुवात केली. अश्विनी हिनेदेखील स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा गाजवल्या. एम.ए., एम.पी.एड. पूर्ण करत तिनं मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांकदेखील पटकावला होता. खेळ आणि शिक्षण यांची उत्तम सांगड घालत या मुलींनी कबड्डीत स्वत:चा आता आणखी एक नवा मार्ग चोखाळला आहे.
 
 - रोहित नाईक

Web Title: Kabaddi cometry and two sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.