डोक्यावर हॅट फुलाफुलांची बॅग

By admin | Published: April 16, 2015 05:26 PM2015-04-16T17:26:19+5:302015-04-16T17:26:19+5:30

या उन्हाळ्याचा नाराच आहे; बी सिम्पल! प्लेन शर्ट्स, कॅप्री, जॅकेट्स आणि स्टोल या चार गोष्टी तुमचा समर लूक एकदम ‘कूल’ करू शकतात!

Hat Flowers Bag on Head | डोक्यावर हॅट फुलाफुलांची बॅग

डोक्यावर हॅट फुलाफुलांची बॅग

Next
 
 
आपल्याकडचा उन्हाळा भारी ‘कडक’!
गर्मीनं जीव नको होतोच, त्यात आपले अंगभर कपडे, त्यांना तर पर्याय नाही!
आणि तेच कपडे जर आपण चुकीचे घालत असू तर हमखास आपला जीव उकाडय़ानं हैराण होतोच!
अनेकांना वाटतं, उन्हाळी कपडे म्हणजे काहीतरी नवीन फॅशनेबल फॅड, समर कलेक्शन नावाचं!
खरं तर तसं काही नाही, आपला उन्हाळा सुसह्य होईल असे कपडे घालणं आणि ते कपडे डोळ्यांना तजेला देत आपल्याला उत्साह देतील अशी योजना करणं हा यातला साधा नियम!
त्यामुळे या उन्हाळ्यात कूल काय, इन काय याची चर्चा करण्यापेक्षा आणि जे दुसरे करतात तेच करत बसण्यापेक्षा आपण उन्हाळ्यात काय घालायचं याचे काही बेसिक नियम समजून घेऊ!
1) फॅब्रिक
म्हणजे खरं तर कपडा ! जाडंभरडं नसलेलं, वजनाला जड नसलेलं हलकंफुलकं, लाईट आणि नॅचरल फॅब्रिक याकाळात वापरावं. सिन्थेटिक कपडे उन्हाळ्यात अजिबात घालू नयेत. घाम आला की त्या कपडय़ांना लवकर दरुगध येतो आणि ते त्वचेला घासले जाऊन रॅशही येऊ शकते. तेच जिन्सचंही. घामानं जिन्स घट्ट चिकटून बसते. त्याचाही त्रस होऊ शकतोच.
काय वापरावं?
कॉटन, लिनन आणि कॉटनबेस स्ट्रेचेबल फॅब्रिक याकाळात उत्तम.
मस्त कॉटनचे ड्रेस वापरण्याचे हौस याकाळात करून घ्या!
 
2) फॅब्रिक
रंग उष्णता शोषून घेतात हे तर आपल्याला माहिती आहेच. काळा, नेव्ही ब्ल्यू, गडद हिरवा, डार्क ब्राऊन, ग्रे हे रंग उन्हाळ्यात टाळावेत. त्याच्याऐवजी लाइट कलर वापरावेत. अर्थात त्यातही टॅक्सी लाइट वापरू नये, त्यानं अजून जास्त सूर्यप्रकाश परावर्तीत होतो. म्हणून उन्हाळ्यात पेस्टल कलर्स वापरावेत. पेल यलो, लाइट पिंक, स्काय ब्ल्यू, ऑफ व्हाइट हे रंग उन्हाळ्यात एकदम कूल दिसतात. 
नियम लक्षात ठेवायचा तो इतकाच! 
 
तरुणांसाठी
समर स्टाइल
 
1) लिनन पॅण्ट्स, शायनोज्, कॉटन पॅण्ट्स, त्यावर मलमलचे शर्ट्स, कॉटनचे टेक्शर्ड शर्ट्स, किंवा लिननचे शर्ट्स हे उन्हाळ्यात सगळ्यात मस्त कपडे.
2)  मोठमोठय़ा प्रिण्टच्या पॅण्ट, ब्राइट कलर, जरा जास्तच बोल्ड कलर उन्हाळ्यात अजिबात वापरू नयेत.
सध्या सुपरइन काय आहे?
* सध्या फॅशन आहे ती ज्युटबेस्ड शर्ट्सची. ते वापरणं तर एकदम स्टायलिश!
* एखादं फंक्शन असेल, पार्टी असेल, कार्यक्रम असेल तर एखादं मस्त लिनन किंवा कॉटनचं जॅकेट घाला. तसंही सध्या जॅकेटची खूप फॅशन आहे. त्यामुळे जॅकेट घालणं तसंही ट्रेण्डी. 
हे  घालताना काळजी फक्त एकच घ्यायची, शोल्डर पॅडिंग ठेवायचं नाही. आणि शक्यतो लिननचे जॅकेट घाला, ते पातळ तर असतातच, पण एक मस्त फॅशन स्टेटमेण्टही देतात.
* एकदम स्टायलिश लूक हवा असेल तुमच्याकडे हवा एक स्टोल आणि एक हॅट!
प्लेन टी शर्ट, गळ्याभोवती एखादा प्लेन कॉटन स्टोल आणि डोक्यावर हॅट!  हे म्हणजे परफेक्ट यंग आणि कॅज्युअल लूक!
या उन्हाळ्यात हा लूक एकदा ट्राय करून पहाच!
 
तरुणींसाठी
समर स्टाइल
 
1) उन्हाळा म्हणजे लगAसराईचा सिझन. प्रश्न असतोच, काय घालायचं? मस्त तर दिसायचंय.
त्यावर उत्तर एकच, मस्त साडी नेसा!
या सिझनमध्ये साडी एकदम सुपरकूल! 
ट्रॅडिशनल सलवार कुर्ताही वापरा, मस्त ब्राइट कलरचा!
2) मात्र हे सारं घालून भरमसाठ, चकचकीत दागिने घालू नका. त्यापेक्षा एखादीच मोत्याची सर, एखादाच मोत्याचा ठसठशीत दागिना घाला. जास्त काही नको. हा एवढा लूक या समर फेस्टिव्ह सिझनसाठी तुमचा नूरच बदलून टाकेल!
सध्या सुपरइन काय आहे?
* फ्लोरल प्रिण्टची सध्या खूप क्रेझ आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात काहीही वापरा, त्यावर फ्लोरल प्रिण्ट असलं की तुम्ही फॅशनेबल !
2) त्यातही हेरम पॅण्ट्स, कॅप्रीज्, त्यावर एखादा प्लेन कॅज्युअल टी-शर्ट हा एवढा लूक तुम्हाला परफेक्ट समर लूक देईल !
3) तुम्ही असे वेस्टर्न कपडे वापरत नसाल आणि सलवार कुर्ताच वापरत असाल तर कॉण्ट्रास्ट कॉम्बिनेशन करा. म्हणजे प्लेन कुर्ते, त्यावर प्रिण्टेड पटियाला आणि दुपट्टा असं कॉम्बिनेशन सुपर्ब. एकदम फॅशनेबल!
 
स्टाइल स्टेटमेण्ट काय म्हणतं?
इन 
1) कॅज्युअल प्लेन टी-शर्ट.
2) कॉटनचे शर्ट्स, पॅण्ट्स.
3) कॉटन आणि लिननचे जॅकेट्स
4) पेस्टल शेड्स
5) चांगला ब्रॅण्डेड गॉगल
6) गळ्याभोवती कॉटन स्टोल.
7) हॅट
8) थ्रीफोर्थ आणि कॅप्री.
9) फ्लोरल प्रिण्ट्स
1क्) हेरम पॅण्ट्स
11) फ्लोरल अॅक्सेसरीज म्हणजेच बॅग, 
क्लिप्स, घडय़ाळं, ब्रेसलेट, चपला !
-प्राची खाडे
स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर

Web Title: Hat Flowers Bag on Head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.