गेमिंगचा नाद लागलाय ? त्यात करिअर होऊ शकतं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 02:55 PM2019-01-10T14:55:34+5:302019-01-10T14:56:03+5:30

गेमिंग/हॅकिंग/अ‍ॅप्स मेकिंग या करिअरच्या वाटा आहेत हे कुणाला खरं वाटलं असतं? -तरुण मुलांना वाटतं !

Gaming Can it be a career? | गेमिंगचा नाद लागलाय ? त्यात करिअर होऊ शकतं ?

गेमिंगचा नाद लागलाय ? त्यात करिअर होऊ शकतं ?

Next
ठळक मुद्दे गेमिंगचा नाद लागून बारावीत टप्पा खाल्लेला आर्य पुढे कुठे गेला? - थेट लंडन!

प्राची  पाठक 

आर्य. बारावीचं वर्ष म्हणजे कफ्यरु असतो घरांमध्ये. अभ्यास एके अभ्यास. आयुष्यातले हेच एकमेव महत्त्वाचं वर्ष आहे अशा सुतकी वातावरणात अनेक घरं असतात. आर्य बारावीत कॉलेजला जरूर जात असे; पण कॉलेज झाल्यावर गेमिंग कॅफेमध्येही खेळायला जात असे. काही दिवस गेल्यावर त्याच्या आईच्या त्याची ही सवय लक्षात आली. त्या स्वतर्‍ समुपदेशक. त्यांनी त्याला समजावून सांगितलं. पण आर्य गेमिंगच्या विश्वात पुरता रमला होता. समजावून सांगितल्यावरही ऐकत नाही म्हटल्यावर पुढच्या वेळी आईनेच आर्यला गेमिंग कॅफेसाठी म्हणून काही पैसे काढून दिले. तो आर्यसाठी टर्निग पॉइंट ठरला. आईच्या या कृतीमुळे आपला नेमका कल काय आहे, आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, किती वेगळं आणि केअरिंग कुटुंब आपल्यासाठी आहे, याची लख्ख जाणीव त्याला झाली.
तेव्हापासून पुढचा गेमिंगचा प्रवाससुद्धा पालकांच्या सोबत गेमिंगच्या विविध पैलूंची चर्चा करत सुरू झाला. आर्यने स्वतर्‍च गेमिंगच्या विश्वाची भरपूर माहिती काढली. गेम स्टडीज, गेम डिझाइन, गेम आर्ट, गेम डेव्हलपमेंट असे अनेक पर्याय त्यातसुद्धा असल्याचं त्याच्या लक्षात आलं. करिअर हे अंतिम ध्येय नसून ती एक प्रोसेस असते, हे आर्यने समुपदेशक आईकडूनच जाणून घेतलं. 
बारावीत गेमिंगमध्ये पुरता बुडलेला असल्यानं आर्य एका विषयात नापास झाला होता. पण हा निकाल हातात यायच्या आधीच त्याला घरून समंजस साथ मिळालेली होती. एरवी जे व्यसन म्हणून पाहिलं गेलं असतं ते गेमिंगचं विश्व ‘यात काहीतरी शिकता येईल, आपला ओढा तिकडे आहे’, या स्पष्टतेपर्यंत येऊन पोहचलं होतं.
एरवीच्या भाषेत ज्याला वर्ष वाया जाणं म्हणतात, तसं न होता आर्य आता गेमिंग या फिल्डमध्येच विद्यार्थी म्हणून दाखल झाला होता. सतत गेम्स खेळतो, तर शिकू गेमिंगच असा उतावळेपणा त्यात नव्हता. तो एक समजून उमजून घेतलेला निर्णय होता. वेगवेगळ्या अ‍ॅण्टिटय़ूड टेस्ट्स मधून पार पडून. त्यामुळे आर्यचं पुढचं शिक्षण गेम स्टडीमध्येच सुरू झालं. त्यात एक वर्ष पूर्ण केल्यावर त्यानं लंडनला गेम डिझायनिंगला अ‍ॅडमिशन घेतली. तोवर तो बारावीतला एक राहिलेला विषयसुद्धा चांगल्या गुणांनी पास झालेला होता.
करिअर हा अंतिम टप्पा नसतो, तर ती एक प्रोसेस असते, हा अनुभव या वळणावर त्याला परत आला. आपल्याला गेम डिझायनिंगपेक्षा गेम स्टडीजमध्ये जास्त रस आहे, ते एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. स्पेसिफिक असं फिल्ड त्यानं आता निवडलं होतं.
विशेष म्हणजे आपल्या मुलाचं वर्ष वाया तर जात नाही ना यावर कपाळावर मोठ्ठी आठी घेऊन वावरण्यापेक्षा आपला मुलगा कोणत्या मानसिक टप्प्यावरून जातोय, याबद्दल सजग असलेल्या पालकांनी याही वळणावर त्याला साथ दिली. आर्य आता गेम स्टडीजवर फोकस करतो आहे.
करिअर आकाराला येईलही; पण महत्त्वाचं काय, तर आपल्या आवडीनिवडीवर नीट विचार करून त्यात काही शिकणं. त्यासाठी घरची साथ मिळणं. स्वतर्‍ माहिती काढणं, धडपड करणं. इनिशिएटिव्ह घेणं! 
वेगळ्या वाटेने धडपड करणार्‍या मुलांना घरून अशी साथ मिळतेच असं नाही. आपल्याला माहीतच नसलेल्या आणि पूर्णतर्‍ वेगळ्या अशा फिल्डमध्ये करिअर करायचं स्वप्न बघणार्‍या मुलाच्या पाठीशी उभं राहणं, त्याला उगाच आंधळ्या मायेनं न गोंजारणं, अशी दुहेरी कसरत पालकांनासुद्धा करावी लागते. म्हणूनच या टप्प्यावर आर्य आणि त्याच्या पालकांनी कमावलेली स्पष्टता फार महत्त्वाची आहे. करिअरची ही प्रोसेस तो मनापासून पार पडताना दिसते, ते म्हणूनच! 
अर्थात आर्य हा अपवाद नाही, आपल्या वाटा आपण शोधणारे आता असे अनेकजण नक्की आहेत.

वेड लागतं,
त्याचीच पुढे करिअर होते..


1. ‘काय ते सारखं मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसायचं?’ 
- हा घरोघरचा डायलॉग. हा डायलॉग तरुण मुलांवर क्षेपणास्नसारखा सोडून घरातले ज्येष्ठ नंतर स्वतर्‍ही आपापल्या मोबाइलमध्ये आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये डोकं घालून बसतात. मोबाइलचं आकर्षण, कम्प्युटर्स, लॅपटॉप्स, टॅब, पॅड वगैरे विविधता आणि त्यातून मिळणार्‍या सोयी ही आता सगळ्यांचीच गरज बनली आहे. ‘मोबाइल र्‍ शाप की वरदान’ वगैरे रटाळ निबंध गळ्यात पाडून घ्यायच्या आतच ते यंत्र त्यांच्या आधीच्या पिढीच्या हातात येऊन पडलं होतं ! त्यामुळे, त्यांना शाप आणि वरदान अशा दुहेरी मांडणीपेक्षा आणखी वेगळं त्यात काही असतं, हेही कळलं होतं. एकांगी कट्टरता काहीच कामाची नसते, हे समजून घ्यायलासुद्धा हे उदाहरण महत्त्वाचं आहे. 
2. मोबाइल आल्यावर गेमिंगचं फॅड फार झपाटय़ानं वाढलं. त्या आधी घराघरांत आलेल्या संगणकांमध्ये काही मोजके गेम्स कॉम्प्युटरवाला टाकून जात असे. त्या गेम्समुळेसुद्धा उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. या गेम्समध्ये आकाराला आलेलं खोटं विश्व, त्या खेळांचा वेग, त्यातली हाणामारी, हिंसा, धरपकड, शूट करणं, तोडफोड वगैरे हे सगळं एका अर्थी चिंतेचं कारण होतंच. पण तरीही त्यांची संख्या मर्यादित होती. हळूहळू गेमिंगमध्ये प्रचंड व्हरायटी यायला लागली. वेगवेगळ्या लेव्हल्स पार करत पुढे जायचं आकर्षण लोकांना वाटू लागलं. काहींना त्याचं व्यसन जडलं, तर काहींना एका जागी बसून हे खेळत बसल्यानं शरीरावर विविध अपाय जाणवू लागले. ही एक बाजू!
3. दुसरी बाजू म्हणजे, आपल्या मुलाला गेमिंग कॅफेमध्ये जाताना बघणं. वेळ आणि पैसाही वाया घालवताना बघणं. ‘हीच वर्ष आहेत करिअरची’ हा दबाव जरी आपल्या मुलांवर टाकायचा नसला तरी त्यात व्यावहारिक तथ्य असतंच. गेमिंगमध्ये रमलेल्या मुलाला ते करून जितका आनंद मिळत असतो, तितकंच मोठं आव्हान त्याच्या पालकांना त्याला आयुष्याचं भान देण्यात असतं. 
4. आता मात्र काळ बराच पुढं सरकला आहे. आणि तंत्रज्ञानासह अनेक नवी करिअर तरुण मुलांनी आपलीशी करणंही सुरू केलं आहे. त्या करिअरच्या वाटय़ा त्यांच्या पालकांना ना माहीत आहेत, ना त्या वाटेवरच्या धोक्यांचा काही परिचय आहे. मात्र तरीही गेमिंग/हॅकिंग, सायबर सिक्युरिटी अशा वाटेनं अनेक तरुण मुलंमुली सहज निघाली आहेत. त्यातले काहीजण तर कुठलाही कोर्स न करताही आपण स्वतर्‍ काही गोष्टी करून पाहत, ऑनलाइन शिकत एक वाट तयार करकरून पुढं जात आहेत.
5. हे नव्या वाटा चालणं, सोपं कसं असेल; पण ज्यांनी धाडस केलं ते आता निघालेत नवीन काही शोधत.

Web Title: Gaming Can it be a career?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.