बीईच्या डिग्रीचं करू काय?

By admin | Published: May 28, 2015 03:06 PM2015-05-28T15:06:10+5:302015-05-28T15:06:10+5:30

काय वाट्टेल ते झालं तरी चालेल, बीईचा टिळा लावायचाच असं तुमचं ठाम मत आहे? मग तुम्ही इंजिनिअर कदाचित व्हालही पण तुमचं करिअर मात्र धोक्यात आहे.

Do you do BE degree? | बीईच्या डिग्रीचं करू काय?

बीईच्या डिग्रीचं करू काय?

Next
 - डॉ. सुनील कुटे 
सिनेट मेंबर, सावित्रीबाई फुले  पुणे विद्यापीठ
 
दहावीनंतर डिप्लोमाला जावं की बारावीनंतर डिग्रीला?
 
इंजिनिअर तर व्हायचंय पण डिप्लोमा की डिग्री हा निर्णय ज्यांचा होत नाही त्यांनी काही गोष्टींचा अत्यंत ठाम विचार करून निर्णय घ्यायला हवा. हा निर्णय घेण्यासाठीची ही काही आवश्यक सूत्रं. ती वापरावीत आणि मग ठरवावं की आपण डिप्लोमा करायचा की डिग्रीचा पर्याय निवडायचा! ही जी सूत्रं इथं दिली आहेत ती स्वत:ला लावून पहावीत आणि खरंच आपण उत्तम इंजिनिअर बनू शकतो का, तशी आपली इच्छा-क्षमता आणि तयारी आहे का याचा विचार करून मगच निर्णय घ्यावा!
 
दहावीनंतर डिप्लोमाला कुणी जावं?
* ज्यांना सी.ई.टी., जे.ई.ई. (मेन),जे.ई.ई. (अॅडव्हान्स) सारख्या प्रवेश परीक्षांच्या यशाबद्दल खात्री आणि आत्मविश्वास नाही त्यांनी डिप्लोमाचा विचार करावा.
* ज्यांना वरील परीक्षांसाठी स्वतंत्र शिकवणी (क्लास) लावण्याची गरज आहे, परंतु त्यासाठी लागणारा खर्च परवडणारा नाही.
* डिप्लोमानंतर डिग्रीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी प्रत्येक वर्गात केवळ एकूण 12 जागा असतात. त्यात सहा राखीव, दोन मुलींसाठी राखीव, एक अपंगांसाठी राखीव आणि एक स्वायत्त तंत्रनिकेतनसाठी राखीव असते याची पूर्वकल्पना असते. मात्र तरीही सर्व राखीव जागा वगळता शिल्लक राहिलेल्या जागांमधून प्रवेश मिळविण्याइतके गुण व आत्मविश्वास आहे.
* ज्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेशासाठी किमान 6क् टक्के (त्यापेक्षा एकही गुण कमी नको) गुण मिळवावे लागतात तरच प्रवेशाला पात्र ठरतो याची पूर्वकल्पना आहे.
* ज्यांना मनाजोगत्या व चांगल्या महाविद्यालयात थेट द्वितीय वर्षाला प्रवेश हवा आहे व डिप्लोमाच्या अंतिम वर्षात 80 ते 90 टक्के गुण मिळविण्याची खात्री आहे.
* साठ टक्क्यांपेक्षा डिप्लोमाला अंतिम वर्षात कमी गुण मिळाल्यास, जिथे कुठे शिल्लक जागा आहेत त्या कोणत्याही महाविद्यालयात मिळालेल्या मार्कावर आधारित मिळणा:या विद्याशाखेला डिग्रीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्याची तयारी आहे. (म्हणजे थोडक्यात एक वर्ष वाया जाणार याची मानसिक तयारी आहे.)
* डिप्लोमानंतर डिग्रीच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर गणित व गणिताशी संबंधित काही विषय काही जणांना अवघड जातात. अशा अवघड वाटणा:या विषयात वर्ष वाया जाऊ नये म्हणून ज्यांची जास्त मेहनत करण्याची तयारी आहे.
* ज्यांना डिप्लोमानंतर अंतिम वर्षात चांगले गुण न मिळाल्यामुळे थेट द्वितीय वर्षाला प्रवेशच मिळाला नाही किंवा मनोजोगत्या ठिकाणच्या हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही तर पुढे आयुष्यात डिग्री केलीच पाहिजे असा आग्रह नाही, डिप्लोमा ह्याच प्रमाणपत्रवर आयुष्यभर राहण्याची तयारी आहे त्यांनी.
*ज्यांना परिस्थितीमुळे सहा वर्षे शिकणो शक्य नाही, तीन वर्षात शिक्षण संपवून झटपट अर्थाजर्न करून घर चालवायचे आहे.
* ज्यांची पदवी मिळविण्याइतकी बौद्धिक क्षमता नाही किंवा अन्य काही परिस्थितीमुळे ते शक्य नाही. पण तरीसुद्धा लगAाच्या वेळी मूळ शिक्षण दहावी खूपच कमी वाटते तेव्हा डिप्लोमा (इंजिनिअर!) हा मधला सन्मानजनक टप्पा ज्यांना वाटतो.
* आयआयटी- एनआयटीमध्ये शिकण्याची इच्छा वा क्षमता नाही अशा सगळ्यांनी जरूर डिप्लोमाला जावं?
 
 
बारावीनंतर डिग्रीला कुणी जावं? म्हणजेच बीई कुणी करावं?
* ज्यांना जेईई (मेन), जेईई (अॅडव्हान्स), सीईटी इत्यादि स्पर्धा परीक्षांचा ताण वाटत नाही व या परीक्षांमध्ये आवश्यक ते गुण मिळवू याची खात्री व आत्मविश्वास आहे.
* ज्यांना वरील स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र मार्गदर्शनाची गरज वाटत नाही अथवा गरज असल्यास त्यासाठी लागणारा खर्च परवडू शकतो.
* ज्यांना शासनाच्या सततच्या बदलणा:या धोरणांना (म्हणजे जसे केवळ सीईटी, केवळ जेईई, 5क् टक्के सीईटी + 50 टक्के, जेईई 50 टक्के, बोर्ड+50 टक्के सीईटी, 50 टक्के बोर्ड + 50 टक्के जेईई किंवा भविष्यात याहून काही वेगळे!) सामोरे जाण्याची मानसिक तयारी आहे.
* ज्यांना कोणता अभ्यासक्रम निवडावा याचे स्वातंत्र्य दोन वर्षानंतर (म्हणजे बारावीनंतर) घ्यावयाचे आहे. कारण डिप्लोमाला प्रवेश घेतल्यास अभ्यासक्रम (विद्याशाखा) याचा निर्णय दहावीनंतर लगेचच घ्यावा लागतो.
* ज्यांना आयआयटी किंवा एनआयटी यात प्रथम प्रवेशासाठी प्रयत्न करायचे आहेत (हे डिप्लोमानंतर शक्य नसते) व तसे न जमल्यास इतर अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी करायची आहे.
* ज्यांना अनेक स्वायत्त विद्यापीठे वा संस्थांमध्येही (जसे बीट्स पिलाणी, व्ही.आय.टी. वेल्होर, मणिपाल इत्यादि) प्रयत्न करायचा आहे.
* ज्यांना डिप्लोमामध्ये गणित व त्यावर आधारित विषयांचा मूळ पाया कच्च राहतो व त्यामुळे पुढे थेट द्वितीय वर्ष प्रवेशानंतर हे विषय अवघड जातील किंवा त्यामुळे वर्ष वाया जाईल याची भीती वाटते.
* ज्यांना डिप्लोमानंतर डिग्रीला जाण्यासाठी बारावीनंतरच्या तुलनेत खूपच कमी जागा असतात. त्यातून आपल्याला डिप्लोमाच्या अंतिम वर्षात किमान 6क् टक्के व मनाजोगते महाविद्यालय मिळण्यासाठी 80 ते 90-95 टक्के गुण मिळण्याची खात्री व आत्मविश्वास नाही.
* ज्यांना आपण दहावीच्या पातळीवर पुरेसे प्रगल्भ नाही, बारावीनंतर थोडे प्रगल्भ (मॅच्युअर) होऊ असे वाटते. अजून दोन वर्षानंतर आपण अधिक जबाबदार व बुद्धिमान होऊ असे वाटते.
* ज्यांना डिप्लोमानंतर चुकून काही कारणांमुळे डिग्रीला प्रवेश मिळाला नाही तर आयुष्यभर डिप्लोमा होल्डर राहू, पदवीधारक बनता येणार नाही अशी भीती वाटते.
* ज्यांना कौटुंबिक परिस्थितीमुळे झटपट तीन वर्षात अर्थाजर्न करण्याची निकड नाही..
* ज्यांना डिग्रीनंतर ज्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांना (जसे गेट, यू.पी.एस.सी., आय.ई.एस.ई.) सामोरे जाण्याची क्षमता व मानसिक तयारी बारावीपासूनच सुरू व्हावी असं वाटतं त्यांनीच डिग्रीचा विचार केलेला बरा!
 
-
 
 
अनेक मुलांना वाटतं, यंदा काही चांगला परफॉर्मन्स झाला नाही, ड्रॉप घेऊ! पण तो ड्रॉप घ्यावा का? कुणी घ्यावा? का घ्यावा?
 
 
* संपूर्ण तयारी झालेली आहे, परीक्षा दिली तर अपेक्षित गुणही मिळतील; पण परीक्षेच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्याने शरीराने परीक्षा केंद्रावर जाता येत नाही त्यांनी ड्रॉप घ्यावा.
* यंदा ड्रॉप घेतल्यास एक वर्ष तयारीला जास्त मिळेल तसेच एक वर्षाने बुद्धी वाढेल तेव्हा यंदा मिळाले असते त्यापेक्षा किमान 10-20 टक्के जास्त गुण मिळतील अशी खात्री आहे त्यांनी ड्रॉपचा विचार करायला हरकत नाही.
* संपूर्ण तयारी झालेली आहे पण परीक्षेच्या दिवशी अगदी रक्ताच्या नात्याचे घरातील कुणी दगावले तरीसुद्धा गेलेल्या व्यक्तीला श्रद्धांजली म्हणून अपेक्षित गुण मिळवून दाखविण्यासाठी परीक्षा द्यावी. पण ह्या मानसिक धक्क्यात खरोखर कोलमडून पडला असाल तर ड्रॉप घेण्यास हरकत नाही.
* शरीर, मन, बुद्धी, नैसर्गिक आपत्ती, संप, वाहतूक खोळंबा, दंगल व यांसारख्या तत्सम आपल्या हातात नसलेल्या कारणांसाठी ड्रॉप घ्यावा.
* निष्काळजीपणामुळे परीक्षा अर्ज भरताना चूक झाली, बँकेचा डिमांड ड्राफ्ट चुकीचा काढला, ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत सगळा अर्ज भरून झाल्यावर शेवटी ‘सेव्ह’ केला नाही, चुकीची माहिती भरल्यामुळे हॉल तिकीट चुकले व  ते आयत्या वेळेला दुरुस्त करून मिळाले नाही तेव्हा मजबुरी म्हणून वा चुकीची शिक्षा म्हणून ड्रॉप घ्यावा लागतो.
* शंभरातील 5-10 जणांचाच आलेख ड्रॉपनंतर पुढच्या वर्षी उंचावतो असा सर्वसाधारण अनुभव आहे. ज्यांना आपण त्या 5-10 जणांतील असामान्य व असाधारण आहोत याची खात्री आहे त्यांनीच ड्रॉप घ्यावा. अन्यथा ‘दिल बहलाने के लिए गालिब खयाल अच्छा है’!
 
ड्रॉप कुणी होऊ नये?
* ज्याने वर्षभर स्वत:ला फसवले, पालकांना, नातेवाइकांना, शिक्षकांना खोटी आश्वासने दिली, त्यांच्याकडून ड्रॉप घेऊनही पुढच्या वर्षी काहीही भव्यदिव्य होत नाही अशांनी ड्रॉप घेऊ नये.
* ज्याने मित्रंच्या सहवासात मौजमजा केली, प्रामाणिकपणो इतर जण कष्ट व मेहनत घेत असताना त्यांची चेष्टा व टिंगलटवाळी केली त्याने ड्रॉप घेऊ नये.
* ज्याच्या वर्तनात अभ्यासाकडे दुर्लक्ष करणो हा शौर्य व काहीतरी वेगळेपण दाखविण्याचा कल आहे किंवा अभ्यास ही काही पहिल्या दिवसापासून करण्याची कृती नाही, शेवटच्या क्षणी ‘मॅच फिरवता’ येते अशा आशयाचे वागणो आहे त्याने ड्रॉप घेऊ नये.
* अभ्यासाबद्दलचे ढिसाळ नियोजन, वेळ व्यवस्थापनात प्रचंड अपयश, प्रत्यक्ष अभ्यासाला बसल्यावर खूपच थोडासा अभ्यास होणं असं ज्यांच्या बाबतीत वर्षभर होतं त्यांना परीक्षेच्या काळात आत्मविश्वास ढासळणो, भीती वाटणो, झोप न येणो, टेन्शन येणो, अवस्थ वाटणो, केलेला अभ्यास विसरणो, भूक न लागणो, आत्महत्त्येचे विचार मनात येणो किंवा संवेदना हरवल्यामुळे निगरगट्ट बनून ही सगळी परीक्षा फालतू आहे अशी टीकात्मक भाषा करणो अशी लक्षणो दिसतात असे विद्यार्थी ड्रॉप होऊनही पुढील वर्षी फार भव्यदिव्य, देदीप्यमान प्रगती करतीलच याची शाश्वती नसते. अशांनी मुकाटपणो परिस्थिती मान्य करून परीक्षा देऊन ड्रॉप टाळणो हितकारक.
* ज्यांना स्वत:बद्दल फाजील आत्मविश्वास आहे, प्रचंड इगो आहे, इतरांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती आहे, प्रसंगी शिक्षक, पालक, विषयतज्ज्ञ यांच्यापेक्षा आम्हाला जास्त कळतं कारण ते जुनाट आहेत असा ठाम विश्वास आहे त्यांनी ड्रॉप घेऊनही वरील मानसिकतेत बदल होणार नसेल तर फायदा नाही.
* जे परिस्थितीला दोष देतात, महाविद्यालयाला नावे ठेवतात, शिक्षकांवर टीका करतात, पालकांच्या आर्थिक परिस्थितीला हिनवतात, मित्र-मैत्रिणींशी तासन्तास मैफली रंगवतात वा मोबाइलवर बोलतात त्यांनी ड्रॉप घेऊ नये.
* परीक्षा हे एक युद्ध आहे असे मानून ज्यांनी वर्षभर सुनियोजित वेळापत्रक आखून शरीर, मन व बुद्धी यात समन्वय ठेवून, वेळच्या वेळी ठरविलेल्या ध्येयार्पयत मजल गाठून, सातत्याने आढावा घेत, पुढील नियोजनाकडे लक्ष देत, आवश्यक तेवढा सराव करीत अभ्यासाकडे लक्ष दिलेले नाही त्यांनी ड्रॉप घेऊ नये.
* शून्य टक्के वेळेचा अपव्यय म्हणजे 1क्क् टक्के वेळेचे व्यवस्थापन यावर ज्यांचा विश्वास नाही, मोबाइल, इंटरनेट, सोशल नेटवर्किग साइट्स, सिनेमे, गप्पांच्या मैफली, घराखाली व कँटीनला तासन्तास गप्पा यात ज्यांनी वर्षभर सातत्य ठेवले आहे त्यांनी ड्रॉप घेऊ नये.
* यंदा पेपर अवघड होते, फिजिक्स सगळ्यांना अवघड गेला. पॅटर्न बदलला. कुणालाच वेळ पुरला नाही. क्लासच्या सरांनीही असंच सांगितलं. या फुटकळ गोष्टी सांगणा:यांनी ड्रॉप घेऊ नये. कारण ह्या बाबी सर्वासाठी सारख्याच असतात. याही अवस्थेत कुणीतरी पहिला-दुसरा येतोच.
* ज्या पालकांना आपला पाल्य हुशार आहे पण जेईई अवघड असते, सीईटीचा पॅटर्न बदलतो, शासन सतत धोरणं बदलते असं वाटतं त्यांनीही ड्रॉपचा विचार करण्यात फारसा अर्थ नाही.
* ज्यांच्या स्वत:बद्दल अवास्तव अपेक्षा आहेत आणि ज्यांना सिस्टिम हा मूर्खपणा आहे असं वाटतं त्यांनी अजिबात ड्रॉप घेऊ नये. 
 
इंजिनिअरिंग करताना ब्रँच महत्त्वाची की महाविद्यालय? हव्या त्या ब्रँचला प्रवेश मिळत असेल तर कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घ्यावा का? की महाविद्यालयासाठी ब्रँच बदलावी?
* ब्रँच ही आयुष्यभरासाठी असते. महाविद्यालय हे चार वा तीन (डिप्लोमावाल्यांसाठी) वर्षासाठी असते,. त्यामुळे ब्रँचला जास्त महत्त्व द्यावं!  
* एकदा ब्रँचला महत्त्व द्यायचं असं  दहावी-बारावीला ठरवलं की, त्यानुसार दोन वर्षे चांगल्या महाविद्यालयासाठी व्यवस्थित नियोजन करून प्रथमपासून एकाग्र होऊन अभ्यास करावा. 
* ज्या महाविद्यालयाचे एन.बी.ए. (नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन) प्रमाणीकरण झाले आहे ते महाविद्यालय चांगले मानावयास हरकत नाही. शासनाच्या प्रवेश अर्जात कोणत्या महाविद्यालयाचे असे प्रमाणीकरण झाले आहे याची माहिती उपलब्ध असते.
*अभियांत्रिकी शिक्षणात स्वअध्ययनावर जास्त भर असावा. त्यामुळे यदाकदाचित कमी गुण मिळाले व चांगले महाविद्यालय मिळाले नाही तर स्वाध्यायाने अभ्यासाची भर काढावी.
* महाविद्यालय चांगले नसेल तर तेथून अंतिम वर्षात चांगली प्लेसमेंट (नोकरी) मिळेलच याची खात्री नसते. म्हणून तीन-चार वर्षे आधीच ही वस्तुस्थिती माहीत असल्याने सातत्यपूृर्ण परिश्रमाने व नियोजनाने विद्यापीठात गुणवत्ताधारक म्हणूनच झळकले पाहिजे. बारावीला एकदा धक्का बसल्यावर पुढे तीन-चार वर्षात पूर्वकल्पना असूनही विद्यापीठात न चमकल्यास, चांगल्या महाविद्यालयातूनदेखील अशा विद्याथ्र्याना चांगली नोकरी मिळेलच याची खात्री नाही.
 

 

Web Title: Do you do BE degree?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.