फोन सतत चार्जिगला लावताय, सावध व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:58 PM2018-10-04T16:58:19+5:302018-10-04T16:58:26+5:30

साधारण 100 व्होल्ट्सचा शॉकही माणसासाठी जीवघेणा असू शकतो. त्यामुळे यापुढे फोन चार्जिगला लावून बोलताना, उशाशी ठेवून झोपताना आपल्या जीवाला धोका आहे एवढं लक्षात असू द्या.

constantly charging the phone, beware! | फोन सतत चार्जिगला लावताय, सावध व्हा!

फोन सतत चार्जिगला लावताय, सावध व्हा!

Next

-निशांत महाजन


फोन चार्जिगला लावून, उशाशी घेऊन झोपायची सवय आहे तुम्हाला?  असेल तर तुमचा जीव धोक्यात आहे.  
डायरेक्ट असा अंतिम इशारा पाहून घाबरु नका पण मोबाईल फोनची बॅटरी एक टक्का उरेर्पयत अनेकजण फोनवर बोलतात, मग फोन एकीकडे चार्जिगला लावून बोलतात आणि रात्री झोपताना तर फोन उशाशीच घेवून झोपतात. हे कमीच म्हणून जवळपास जर प्लग असेल तर अगदी उशाजवळ फोन ठेवून तो चार्जिगला लावला जातो. फोन तापतो, चटके बसतात, तरीही बोलणं, व्हॉट्सअ‍ॅपवरच्या गप्पा संपत नाहीत.
हे सारं जीवावर बेतू शकतं.
वॉशिंग्टन पोस्टने या अमेरिकेतील दैनिकानं काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार अशीच घातक सवय एका 32 वर्षाच्या तरुणाच्या जीवावर बेतली. दैव बलवत्तर म्हणून तो बचावला. विल डे नावाचा हा तरुण अलाबामा राज्यात हंण्टसविल या शहरात राहतो. रात्री आपला आयफोन चार्जिगला लावून तो झोपला. फोन उशाशीच होता. सकाळ होता होता कूस बदलली तशी त्याच्या गळ्यातली चेन त्या चार्जरवर पडली. आणि त्याच्या गळ्याला असा भयानक शॉक बसला की त्याचा पूर्ण गळा भाजला गेला, छातीही भाजली गेली. वेळेत दवाखान्यात पोहचल्यानं तो वाचला.
तो सांगतो, मी कधी कल्पनाही केली नव्हती की गळ्यातली चेन, चार्जर या रोजच्या वापरातल्या वस्तूच अशा ब्लास्ट होतील आणि बॉम्ब फुटल्यासारख्या माझ्या अंगावरच फुटतील. 
साधारण 100 व्होल्ट्स इलेक्ट्रिसिटीचा शॉकही माणसासाठी जीवघेणा असू शकतो. त्यामुळे यापुढे फोन चार्जिगला लावून बोलताना, उशाशी ठेवून झोपताना आपल्या जीवाला धोका आहे एवढं लक्षात असू द्या.
बाकी, फोन प्यारा की आपला जीव प्यारा, हे ज्यानं त्यानं ठरवायचं.

 

Web Title: constantly charging the phone, beware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.