ब्रेकलेस आनंदाची बिन्धास्त cycle

By admin | Published: May 4, 2017 06:55 AM2017-05-04T06:55:40+5:302017-05-04T06:55:40+5:30

सायकलने तरुण जगण्यात एक जोरदार एण्ट्री मारली आहे, आणि अनेकजण सायकलवर स्वार होत फिटनेसच्याच नाही, तर आॅफिसच्या दिशेनंही निघालेत. जगण्याचं झपाटलेपण देणारी ही सायकल नक्की देतेय काय तरुण मुलांना?

Breakles Blissful Cycle | ब्रेकलेस आनंदाची बिन्धास्त cycle

ब्रेकलेस आनंदाची बिन्धास्त cycle

Next

 सायकल. हा एक शब्द आपल्यातलं पॅशन जागं करतोच..
लहानपणी शिकलेली सायकल, कुणीतरी धरलेलं कॅरिअर, दोस्तांसोबत दामटलेली सायकल आणि रस्त्यात सतत पडत्या चेनवरून खाल्लेल्या मित्रमैत्रिणींच्या शिव्या..
हे सारं सायकल मेमरी नावाच्या फोल्डरमध्ये आॅटो ओपन होतंच..
पण आपण कॉलेजात जायला लागलो की काय होतं त्या सायकलचं?
बाइक येते, आणि सायकल सायडिंगला जाते..
मात्र अनेक तरुण मुलांच्या आयुष्यात या सायकलनं आता रिएण्ट्री घेतली आहे, पण पॅशचा तडका मात्र तोच..
सायकल म्हणजे गरिबांची गाडी असं म्हणणारे आउटडेटेड ठरावेत, कारण चारचाकीची ऐपत असली तरी सायकलनेच आॅफिसला जाणारी अनेक मुलंमुली आता पुण्या-मुंबईतसुद्धा आहेत.. 
रोज सकाळी काही किलोमीटर नियमित सायकलिंग,
ते सायकलवरून काढलेल्या मोहिमा,
सायकल क्लब,
सायकल कट्टे,
सायकल क्लब.. 
अशी नावं बदलती दिसतील प्रत्येक शहरात, पण त्यातलं वेड आणि झपाटलेपण मात्र सारखंच आहे. आणि वाढतंही आहे.
म्हणून तर अनेक शहरांत आता सायकल क्लब आहेत. ते पहाटे सायकल काढून फिरतात, चांदण्यातलं सायकलिंग करतात. कुणी रविवार मोहिमा करतं, तर कुणी सायकलवरून एकटंच फिरून येतं मनसोक्त..
स्वत:ला हवं तसं फिरण्याची स्वस्त आणि मस्त हमी आणि पूर्ण स्वातंत्र्य ही सायकल देते..
इंधन लागतं ते केवळ झपाटलेल्या मनशक्तीचं आणि मिळणाऱ्या आनंदी ऊर्जेचं!
अशाच काही सायकलवेड्या दोस्तांची, रोजचं सायकलिंग जगणाऱ्या तरुण मुलांची एक खास भेट  .
आणि सायकलिंग करताना मारल्या जाणाऱ्या प्रत्येक पेडलमधून मिळणाऱ्या आनंदाचं रहस्य..
आणि हे सायकलिंगचं प्रेम फक्त आपल्याकडेच नव्यानं आलं आहे असं वाटत असेल तर एक बातमीही हाताशी ठेवा. भविष्यात वाढणाऱ्या बाजारपेठेत सायकल उद्योग नव्यानं वाढत असून, येत्या २०२२ पर्यंत जगभरातला सायकल उद्योग ३४९० कोटी डॉलर्सच्या आसपास पोहचलेला असेल. आणि लहान मुलांच्या सायकल्सपासून माऊण्टन सायकलपर्यंत सगळ्यांचा त्यात समावेश असेल..
हा उद्योग वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जगभरातले जागरूक तरुण आता स्वत:ला विचारू लागलेत की आपण प्रदूषण करणाऱ्यांतल्या गटातले की न करणाऱ्यांतल्या?
प्रदूषण न करणारा गट सायकलवर स्वार होत गाणी गात पुढे निघालेला दिसतोय हे खरं..
 
आॅक्सिजन टीम

 

Web Title: Breakles Blissful Cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.