७० टक्के तरुण हे नोकरी देताना ‘ढ’च वाटतात....नव्या जगात टिकण्याचे ५ स्किल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 02:59 PM2017-09-06T14:59:00+5:302017-09-07T07:09:19+5:30

जगभरातल्या एचआरवाल्यांचा एक सर्व्हे नुकताच प्रसिद्ध झाला. त्यात हे एचआरवाले म्हणतात की, डिग्री घेऊन येणारे नवखे उमेदवार हे कौशल्यात तर कच्चे असतातच; पण त्यांना टीममध्ये काम करता येत नाही, आणि सॉफ्ट स्किल्स मार खातात ते वेगळेच.. त्यामुळे ७० टक्के तरुण हे नोकरी देताना ‘ढ’च वाटतात..

70 percent of young people feel proud while giving jobs ... 5 skills to stay in the new world | ७० टक्के तरुण हे नोकरी देताना ‘ढ’च वाटतात....नव्या जगात टिकण्याचे ५ स्किल्स

७० टक्के तरुण हे नोकरी देताना ‘ढ’च वाटतात....नव्या जगात टिकण्याचे ५ स्किल्स

Next

आपल्याकडे आताशा अशा सर्व्हेचं काही अप्रूप उरलेलं नाही. म्हणजे काय तर सतत हा ना तो अभ्यास असं सांगतच असतो की, अमुक क्षेत्रातले पदवीधर त्याच क्षेत्रात काम करण्यास ना-लायक आहेत. शिक्षण आहे, डिग्री आहे; मात्र कौशल्य नाहीत. थेट कामाला सुरुवात करू शकतील असे स्किल्स नाहीत. विशेष म्हणजे कुठलंही एक क्षेत्र याला अपवाद नाही. अनेक क्षेत्रात हेच रडगाणं. मात्र हे चित्र केवळ भारतापुरतं मर्यादित आहे असंही नाही. जगभरातल्या एण्ट्री लेव्हल कर्मचाºयांविषयी हीच तक्रार आहे. अमेरिकेत काही दिवसांपूर्वी एक अभ्यास प्रसिद्ध झाला आणि त्याचा तपशील जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकातही प्रसिद्ध झाला. प्राइमरोज स्कूल्स या शैक्षणिक संस्थेनं केलेला हा एचआर मॅनेजर्सचा अभ्यास. फक्त अमेरिकतेच नाही तर जगभरातल्या अनेक कंपन्यांतील व्यवस्थापन आणि ह्युमन रिसोर्स सांभाळणाºया अधिकाºयांचा त्यांनी एक सर्व्हे केला. आणि त्या सर्व्हेत विचारलं की, तुम्हाला काय वाटतं? कंपनीत कामाला येणाºया कर्मचाºयांकडे कोणते गुण असावेत, कोणते नसावेत? आजच्या काळात कुठल्या गुणांचा अभाव दिसतो? कुठले गुण अत्यावश्यकच आहेत? त्यावर या एचआर मॅनेजर्सचं असं म्हणणं आहे की, एण्ट्री लेव्हलचे म्हणजे नुकतेच कॉलेजातून डिग्री घेऊन नोकरीला येणारे ७०% कर्मचारी हे अगदीच ‘ढ’ असतात. त्यांना आपल्या विषयातीलही पुरेशी कौशल्य माहिती नसतात. वर्तमानात या क्षेत्रात काय उलाढाल होत आहेत, काय अपडेट्स आहेत, आपल्या क्षेत्राची दिशा काय याचीही काही माहिती नसते. त्यामुळे पायाच कच्चा असलेल्या या माणसांना ट्रेण्ड् करण्यातच कंपनीचा अधिक वेळ जातो. आणि त्यातही जे उत्साही ते शिकतात, अनेकजण ते शिकण्याचेही कष्ट घेत नाहीत. ९०% एचआरवाल्यांचं असंही म्हणणं आहे की, नव्या कर्मचाºयांनी सेल्फ कण्ट्रोल अर्थात स्वयंशिस्त शिकणं फार गरजेचं आहे. सतत कुणीतरी आपल्याला कामाला लावण्यापेक्षा स्वत:हून पुढाकार घेत उत्तम काम केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे टीमवर्क. एकटा माणूस कितीही गुणी असला तरी सध्या कार्पोरेट कल्चर हे टीमवर्कचं आहे. त्यामुळे टीममध्ये उत्तम काम करणं, टीम स्पिरीट सांभाळणं आणि टीमला लीड करणं हे सारं येणं किंवा शिकून घेणं अत्यावश्यक आहे. आपण बड्या, मल्टिनॅशनल कंपन्यांत काम करणार असू, तशी आपली स्वप्न असतील तर तरुण मुलांनी हे सारं माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यादृष्टीने काही स्किल्स स्वत:च शिकायला हवेत. ते स्किल्स विद्यापीठात शिकवले जात नाहीत, ते आपणच स्वत:हून आता नव्या काळात शिकले पाहिजे. त्या स्किलची आणि नव्या संदर्भात त्यांच्या उपयोगाची ही चर्चा. त्यांचा नक्की विचार करा, तर कदाचित आपल्याला नोकरी देताना कुणी ‘ढ’ किंवा ‘ना-लायक’ म्हणणार नाही! 1) ई-मेल लिहिता येतो? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का? हल्ली तर कुणीही ई-मेल लिहितो. पण हे खरं नाही. शंभरात ९० जणांना उत्तम ई-मेल लिहिता येत नाही. काहीजण खूप पाल्हाळ लावतात. काहीजण फक्त उपकार केल्यासारखे ओके किंवा के असं लिहून रिप्लाय करतात. त्यामुळे उत्तम ई-मेल लिहायला शिका. त्याचा मंत्र एकच शॉर्ट, स्विट, उत्तम आॅफिस एटीकेट्स पाळलेली, टू द पॉइण्ट, थेट अशी ई-मेल लिहा. अगदी थोडक्यात मुद्देसूद. तुमचे ५०० शब्दांचे निबंध वाचायला कुणालाच वेळ नाही. तेच पीपीटीचंही. हल्ली जो तो पीपीटी करतो. पण २० मिनिटांचं पीपीटी म्हणजे अती झालं. जे पीपीटीत सांगताय, तेच तोंडी सांगू नका, वाचून दाखवा. १० मिनिटांपेक्षा मोठं पीपीटी पाहण्याची कुणीही तसदी घेत नाही. २) लॅपटॉप चार्ज आहे ना? किती फालतू प्रश्न आहे असं वाटेल वाचून. पण बिझनेस मिटिंगची तयारी हा आत्ताच्या काळात स्पेशलायझेशनचा विषय आहे. अनेकजण इथंच चुकतात. पीपीटी ओपन होत नाही, लॅपटॉप चार्ज नाही, पेनड्राईव्ह कनेक्टच होत नाही, फाईल ओपनच होत नाही, व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये किती बोलायचं, कसं बसायचं याचं भान नाही. तुमचं बिझनेस मिटिंगमधलं इम्प्रेशन कायमचं खराब झालं म्हणून समजा. बारीकसारीक गोेष्टी असतात, त्या चारचारदा तपासून घ्यायची शिस्त लावा. ३) टाइम मॅनेजमेण्ट हा शब्द इतका घासून गुळगुळीत झाला आहे की, ते तर काय आपल्याला येतंच अशा मोडवर असतो आपण सारे; पण ते खरं नाही. आपली अनेक कामं होत नाहीत किंवा झाली तरी कशीबशी होतात. उत्तम होत नाही याचं कारण आपण वेळेचं अजिबात नियोजन करत नाही. ते शिकतच नाही. सतत अस्ताव्यस्त. कामं तुंबलेली. कायमचा घोळ, तकतक. हे सारं बंद करून. आपण कामं कशी करतात, टाइम मॅनेजमेण्ट नेमकं कसं करतात हे शिकून घ्यायला हवं. त्यासाठी आता अनेक आॅनलाइन फुकट कोर्स, माहिती उपलब्ध आहे. गूगल करून पाहा. ४) व्हा पुढे, म्हणा मी करतो..! अनेकांना अंग चोरून काम करायची सवय असते. कुठलंही नवीन काम आलं किंवा आपल्याच डोक्यात एखादी नवीन कल्पना आली तरी आपण हेच म्हणणार की, जाऊ दे, मी कशाला पुढाकार घेऊ? मला काय मिळणार त्यातून, पगारापुरतं काम करू, जास्त कशाला डोकं लावा, ही वृत्ती सोडावी लागेल. आपण आपला प्रोजेक्ट घेणं, स्वत:साठी वेगळं काम करणं, पुढाकार घेणं, नवीन जबाबदारी अंगावर घेणं हे सारं शिकून घ्यावं लागेल. ५) इण्टिलिजण्ट नेटवर्किंग करा नेटवर्किंग हा तसा परवलीचाच शब्द. आपण सारे फेसबुकवर असतो, व्हॉट्सअ‍ॅपवर असतो. विविध ग्रुप्समध्ये चर्चा करतो. मात्र त्या साºयाचा उपयोग व्हायला हवा. त्याला म्हणतात स्मार्ट नेटवर्किंग. म्हणजे आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क करणं, त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकणं, आपलं काम इतरांना दाखवणं, नम्रपणे आपल्या कामाचा प्रचार-प्रसार करणं, नव्या जबाबदाºया अंगावर घेऊन नवीन वर्तुळात जाणं, नव्या माणसांना भेटणं हे सारं म्हणजे स्मार्ट नेटवर्किंग. हे सारं न करता तासन्तास सोशल मीडिया वापरला तर वेळ वाया जाणार, त्यापेक्षा कॉण्टॅक्ट जमवा, त्यातून माणसं जोडा. संधी कमवा.

Web Title: 70 percent of young people feel proud while giving jobs ... 5 skills to stay in the new world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.