विश्वचषक नेमबाजी : मनू भाकरचा डबल धमाका, ओम प्रकाशसह जिंकले दुसरे सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 02:26 AM2018-03-07T02:26:58+5:302018-03-07T02:26:58+5:30

झज्जरच्या (हरियाणा) १६ वर्षीय मनू भाकरने १० मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात ओम प्रकाश मिथरवासह दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर करून आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत खळबळ उडवून दिली. सोमवारी मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णवेध साधला होता.

 World Cup shooting: Manu Bhakar's double-bang, Om Prakash won another gold medal | विश्वचषक नेमबाजी : मनू भाकरचा डबल धमाका, ओम प्रकाशसह जिंकले दुसरे सुवर्णपदक

विश्वचषक नेमबाजी : मनू भाकरचा डबल धमाका, ओम प्रकाशसह जिंकले दुसरे सुवर्णपदक

Next

नवी दिल्ली - झज्जरच्या (हरियाणा) १६ वर्षीय मनू भाकरने १० मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात ओम प्रकाश मिथरवासह दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर करून आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत खळबळ उडवून दिली. सोमवारी मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णवेध साधला होता.
मेक्सिको येथिल गुआदालाजारा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अकरावीत शिक्षण घेत असलेल्या मनूने आपल्या पदार्पणातच वरिष्ठ गटात सुवर्ण पदकांचा डबल धमाका केला. भारतासाठी नंबर वन झालेल्या मनू आणि ओम प्रकाश जोडीने पात्रता फेरीमध्ये ७७० गुण संपादन केले. यासह ते जर्मनीच्या ख्रिस्टियन आणि सांड्रा रेट्ज या पती-पत्नी जोडीच्या मागेच राहिले ज्यांनी विश्वविक्रमी ७७७ गुणांसह अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली होती. अंतिम फेरीत मनू आणि ओम प्रकाशने ४७६.२१ गुणांचे सर्वाधिक लक्ष्य साधून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. यामध्ये भारताच्या महिमा आगरवाल व शहजर रिजवीला ७६३ गुणांसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे दीपक कुमार आणि मेहूल घोष या भारतीय जोडीने चमकदार कामगिरी करताना १० मीटर रायफल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले. यासह भारताच्या पदकाची संख्या सहा झाली आहे. दीपक व मेहूल जोडीने पाच संघांच्या अंतिम फेरीत ४३५.१ गुण संपादन केले. भारतीय जोडीला रोमानियाच्या वे एलिन मोलदोवेयानू व लौरा जार्जेंटा कोमान जोडीकडून पराभूत व्हावे लागले. ज्यांनी ४९८.४ गुणांची कमाई करत बाजी मारली. (वृत्तसंस्था)

‘सुवर्णकन्या’ मनूचा पराक्रम...

भारतीय नेमबाजीच्या इतिहासात सर्वांत कमी वयात (१६ वर्षे) सुवर्णपदकाचा दुहेरी धमाका करणारी मनू पहिली नेमबाज ठरली आहे. या कामगिरीमुळे मनू आॅक्टोबरमध्ये ब्युनस येथे होणाºया युथ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली पहिली युवा नेमबाज आहे.

‘मला काहीच कळत नाही हे कसे साध्य झाले. माझ्यासाठी ही अविश्वसनीय कामगिरी आहे. वरिष्ठ गटात खेळण्याचे माझ्या मनावर थोडे दडपण होते. पण मी निश्चय केला होता की आपल्याला सर्वश्रेष्ठ कामगिरी करायची आहे. या यशामुळे माझा आत्मविश्वास नक्की वाढला आहे. आता माझे लक्ष आगामी स्पर्धांवर राहील. त्यामध्ये मी चांगली कामगिरी करून आपल्या देशासाठी पदक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे,’ अशी प्रतिक्रीया मनूने यावेळी दिली.

Web Title:  World Cup shooting: Manu Bhakar's double-bang, Om Prakash won another gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा