विंडीजच्या भारत दौ:याचे सुधारित वेळापत्रक जाहीर

By admin | Published: September 14, 2014 02:51 AM2014-09-14T02:51:38+5:302014-09-14T02:51:38+5:30

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडीजचा संघ भारत दौ:यावर येणार असून, उभय संघांतील लढतींचे सुधारित वेळापत्रक आज, शनिवारी ‘बीसीसीआय’कडून जाहीर करण्यात आले.

West Indies tour of India: It's updated schedule | विंडीजच्या भारत दौ:याचे सुधारित वेळापत्रक जाहीर

विंडीजच्या भारत दौ:याचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Next
नवी दिल्ली : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडीजचा संघ भारत दौ:यावर येणार असून, उभय संघांतील लढतींचे सुधारित वेळापत्रक आज, शनिवारी ‘बीसीसीआय’कडून जाहीर करण्यात आले. 
विंडीजचा संघ भारत दौ:यात 8 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत 5 वन-डे, 3 कसोटी आणि एक टी-2क् सामना खेळणार आहे. शिवाय दोन सराव सामने आणि बीसीसीआय अध्यक्षीय इलेव्हन संघाविरुद्ध खेळण्याची संधीही विंडीजला मिळणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार, भारत-विंडीज यांच्यातील एकमेव टी-2क् लढत 11 ऑक्टोबरला दिल्लीत होणार होती; मात्र आता सुधारित वेळापत्रकानुसार 11 ऑक्टोबरला दिल्लीत दुसरी वन-डे होणार आहे. एकमेव टी-2क् लढत 22 ऑक्टोबरला कटक येथे खेळली जाईल. कोलकात्यातील ईडनगार्डन्सवर 17 ऑक्टोबरला चौथा एकदिवसीय सामना होणार होता; मात्र आता तेथे 2क् तारखेला पाचवी वन-डे होईल. इतरही लढतींच्या वेळेत आणि ठिकाणांमध्ये बदल करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)
 
तारीखलढतस्थळ
3 ऑक्टोबरसराव सामनामुंबई
5 ऑक्टोबरसराव सामनामुंबई
8 ऑक्टोबर पहिली वन-डेकोच्ची
11 ऑक्टोबरदुसरी वन-डेदिल्ली
14 ऑक्टोबरतिसरी वन-डेविशाखापट्टणम
17 ऑक्टोबरचौथी वन-डेधर्मशाळा
2क् ऑक्टोबरपाचवी वन-डेकोलकाता
22 ऑक्टोबरएकमेव टी-2क्कटक
25 ते 27 ऑक्टोबरसराव सामनाकानपूर
3क् ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरपहिली कसोटीहैदराबाद
7 ते 11 नोव्हेंबरदुसरी कसोटीबंगलोर
15 ते 19 नोव्हेंबरतिसरी कसोटीअहमदाबाद

 

Web Title: West Indies tour of India: It's updated schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.