विजेंदरचा विजयाचा चौकार

By admin | Published: March 13, 2016 11:25 PM2016-03-13T23:25:11+5:302016-03-13T23:25:11+5:30

व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सध्या भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या विजेंदर कुमारला लोळवण्याबाबत बढाया मारणाऱ्या हंगेरीच्या अ‍ॅलेक्सजेंडर होरवाथचा फुगा फुटला.

Vijender's four-wicket haul | विजेंदरचा विजयाचा चौकार

विजेंदरचा विजयाचा चौकार

Next

लिव्हरपूल : व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सध्या भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या विजेंदर कुमारला लोळवण्याबाबत बढाया मारणाऱ्या हंगेरीच्या अ‍ॅलेक्सजेंडर होरवाथचा फुगा फुटला. एकतर्फी झालेल्या या लढतीत भारताच्या विजेंदरने तिसऱ्या फेरीतच होरवाथला त्याची जागा दाखवली आणि व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सलग चौथ्या विजयाची दिमाखात नोंद केली. विशेष म्हणजे या लढतीआधी आपण विजेंदरला हरवण्यासाठी सापाचे रक्त पिऊन ताकद वाढवत असल्याचे होरवाथने जाहीर केले होते; मात्र विजेंदरने देशी घी आणि दुधाची ताकद दाखवून दमदार ‘पंच’ मारले.
याआधी विजेंदरने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीतील तिन्ही विजय दोन फेऱ्यांत मिळवले होते. मात्र या वेळी तिसऱ्या फेरीत विजेंदरने होरवाथला गुडघे टेकण्यास भाग पाडले. आॅलिंपिक कांस्यविजेत्या विजेंदरच्या दमदार व ताकदवर ठोशांनी होरवाथ तिसऱ्या फेरीत गुडघ्यांवर बसला. यानंतर पंचांनी लढत थांबवून विजेंदरला विजयी घोषित केले. पहिल्या फेरीपासूनच विजेंदरने वर्चस्व राखताना होरवाथला बॅकफूटवर नेले होते.
होरवाथने यापूर्वी ७ सामन्यांपैकी ५ लढती जिंकल्या होत्या. लढतीला सुरुवात झाल्यानंतरच विजेता कोण होणार, हे स्पष्ट झाले होते. विजेंदरने होरवाथचा अंदाज घेतल्यानंतर मोक्याच्या वेळी डाव्या हाताने तीन - चार जबरदस्त ठोसे मारले. यामुळे दोन वेळा होरवाथच्या दातांचे प्लॅस्टिक आवरण निघाले. पहिल्या फेरीत वर्चस्व गाजवल्यानंतर दुसऱ्या फेरीतही विजेंदरने होरवाथला संधी दिली नाही.
अंतिम फेरीत विजेंदरने जबरदस्त आक्रमक पवित्रा घेत होरवाथला पराभव मान्य करण्यास भाग
पाडले. तिसऱ्या फेरीच्या पहिल्या मिनिटालाच होरवाथ गुडघ्यांवर बसला. यानंतर पंचांनी काऊंटिंग सुरू करून लढत रोखून विजेंदरला विजयी घोषित केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Vijender's four-wicket haul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.