..म्हणून आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवणे अवघड - महेश भूपती

By admin | Published: September 30, 2016 07:27 PM2016-09-30T19:27:47+5:302016-09-30T19:27:47+5:30

लंडन आॅलिम्पिकच्या तुलनेत रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी निराशा आली. जागतिक स्तरावर टेनिस खुप मोठ्या प्रमाणात खेळला जातो.

Therefore, it is difficult to get a medal in Olympics - Mahesh Bhupathi | ..म्हणून आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवणे अवघड - महेश भूपती

..म्हणून आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवणे अवघड - महेश भूपती

Next


लंडनच्या तुलनेत रिओत भारतीयांची निराशा
महेश चेमटे / मुंबई : लंडन आॅलिम्पिकच्या तुलनेत रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी निराशा आली. जागतिक स्तरावर टेनिस खुप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. परिणामी आॅलिम्पिक टेनिस स्पर्धेत पदक मिळवणे अवघड आहे, असे स्पष्ट मत दिग्गज टेनिसपटू महेश भूपतीने मांडले. सानिया, प्रार्थना यांनी रिओत चांगली कामगिरी केली असून आॅलिम्पिक पदक मिळवण्यासाठी अधिक मेहनतीची आवश्यकता असल्याचेही मत दिग्गज टेनिसपटू महेश भूपतीने व्यक्त केले.
मुंबईत आयोजित खासगी कार्यक्रमात महेश भूपतीने ‘लोकमत’ शी संवाद साधला. आॅलिम्पिकमध्ये टेनिस जलतरण, जिम्नॅस्टीक या खेळांच्या तूलनेत लहान खेळ आहे.

शिवाय टेनिस हा जागतिक स्तरावर खेळला जाणारा खेळ असल्याने टेनिसमध्ये पदक मिळवणे अवघड आहे. मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवणे शक्य असल्याचे भूपती म्हणाला.
देशात आॅलिम्पिक आल्यावरच खेळाचे महत्त्व समजते मात्र त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. परिणामी देशात क्रीडा संस्कृती अस्तित्वात आली नसल्याची खंत यावेळी भूपतीने व्यक्त केली. तो म्हणाला, क्रीडा संस्कृती नसल्यामुळे आॅलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत देखील आपल्याला बहुतांशी खेळात पराभव स्वीकारावा लागत आहे.

केंद्र सरकारच्या नीती आयोगाने २०२४ आॅलिम्पिकसाठी ५० पदकांचे लक्ष्य ठेवले आहे. याबाबत बोलताना भुपती म्हणाला, केंद्र सरकार खेळासाठी खूप चांगले धोरण राबवत असून ते कौतूकास्पद आहे. देशात खेळ वाढवण्यासाठी आक्रमक ‘गेमप्लॅन’ तयार करण्यात येतो, मात्र प्रत्यक्षात प्रभावीपणे अमंलात आणणे गरजेचे आहे. टेनिस खेळात दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी माजी खेळाडूंनी अकादमीची स्थापना करुन नवोदितांना टेनिसचे धडे देणे गरजेचे आहे.

 

Web Title: Therefore, it is difficult to get a medal in Olympics - Mahesh Bhupathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.