सूरज पनवारने अ‍ॅथलेटिक्समध्ये पटकावले ऐतिहासिक रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 06:26 AM2018-10-17T06:26:27+5:302018-10-17T06:26:46+5:30

युवा आॅलिम्पिक: पाच हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत दुसरे स्थान

Suraj Panwar has won the historic silver in athletics | सूरज पनवारने अ‍ॅथलेटिक्समध्ये पटकावले ऐतिहासिक रौप्य

सूरज पनवारने अ‍ॅथलेटिक्समध्ये पटकावले ऐतिहासिक रौप्य

Next

ब्युनास आयर्स : डेहराडूनचा निवासी असलेला अ‍ॅथलिट सूरज पनवार याने येथे सुरू असलेल्या युवा आॅलिम्पिकमध्ये मंगळवारी पाच हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य जिंकले. सूरज ने ‘वॉक रेस’ प्रकारात भारताचा तिरंगा फडकवला.


डेहराडूनच्या प्रेमनगरनजीकच्या एका गावात राहणाऱ्या १७ वर्षांच्या सूरजने सोमवारी पहिल्या टप्प्यात २० मिनिटे २३.३० सेकंद आणि मंगळवारी २० मिनिटे ३५.८७ सेकंद असे एकूण ४० मिनिटे ५९.१७ सेकंद वेळेसह दुसरे स्थान घेतले. पहिल्या टप्प्यात अव्वल स्थानावर राहीलेल्या इक्वाडोरच्या आॅस्कर याने २० मिनिटे १३.६९ सेकंद वेळ नोंदविली होती. दुसºया टप्प्यात त्याने २० मिनिटे ३८.१७ सेकंद वेळ नोंदवित दुसरे स्थान मिळविले. आॅस्करची एकूण वेळ ४० मिनिटे ५१.८६ सेकंद झाल्याने तो सुवर्णाचा मानकरी ठरला.


यंदा युवा आॅलिम्पिकच्या अ‍ॅथलेटिक्स प्रकारात भारताचे हे पहिले पदक ठरले. याआधी २०१०च्या युवा आॅलिम्पिकमध्ये अर्जुनने थाळीफेकीत आणि दुर्गेश कुमारने ४०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते.

 

पदक जिंकणे सुखद अनुभव आहे. हा आनंद अनुभवण्यासाठी मी फार कठोर मेहनत घेतली आहे, देशासाठी हे माझे पहिलेच पदक आहे, वेळेत सुधारणा करण्यासह सिनियर गटात पदक जिंकणे हे आपले पुढील लक्ष्य असेल.
- सूरज पनवार, युथ आॅलिम्पिक रौप्य विजेता

Web Title: Suraj Panwar has won the historic silver in athletics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.