श्रीलंका-इंग्लंड लढत पावसामुळे रद्द

By admin | Published: June 27, 2016 03:56 AM2016-06-27T03:56:25+5:302016-06-27T03:56:25+5:30

श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेलेला तिसरा एकदिवसीय अंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

Sri Lanka-England match canceled due to rain | श्रीलंका-इंग्लंड लढत पावसामुळे रद्द

श्रीलंका-इंग्लंड लढत पावसामुळे रद्द

Next


ब्रिस्टल : श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेलेला तिसरा एकदिवसीय अंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यावेळी ४ षटकांत इंग्लंडच्या १ बाद १६ धावा झाल्या होत्या. मालिकेमध्ये इंग्लंड १-०ने आघाडीवर आहे.
तत्पुर्वी कौशल मेंडिस, दिनेश चांदीमल आणि कर्णधार अ‍ॅन्जोलो मॅथ्यूज यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने इंग्लंडला विजयासाठी २४९ धावांचे आव्हान दिले आहे. श्रीलंकेकडून दिनेश चांदीमल याने सर्वाधिक ७७ चेंडूंत ५ चौकारांसह ६२ धावा केल्या. अ‍ॅन्जोलो मॅथ्यूजने ६७ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ५६, तर कौशल मेंडिसने ६६ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५३ धावांची खेळी सजवली. उपुल थरंगा याने ३३ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह ४० धावांची झटपट खेळी केली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि लिएम प्लंकेट यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे ३४ व ४६ धावा मोजल्या. विले व जॉर्डन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करताना श्रीलंकेला सुरुवातीलाच धावफलकावर ३२ धावा असतानाच दोन धक्के दिले. तथापि, त्यानंतर कौशल मेंडिस आणि दिनेश चांदीमल यांनी १३ षटकांत ५६ धावांची भागीदारी करीत संघाची पडझड थांबवली. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद २४८.(कौशल मेंडिस ५३, दिनेश चांदीमल ६२, अ‍ॅन्जोलो मॅथ्यूज ५६, उपुल थरंगा ४०. ख्रिस वोक्स ३/३४, लिएम प्लंकेट ३/४६, विले १/५५, जॉर्डन १/४९).

Web Title: Sri Lanka-England match canceled due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.