सोनिया, उदय, आदित्य, किरण आघाडीवर
By admin | Published: September 3, 2015 11:05 PM2015-09-03T23:05:47+5:302015-09-03T23:05:47+5:30
सोलापूर: बीएमआयटी महाविद्यालय, बेलाटी येथे सोलापूर विद्यापीठांतर्गत सुरु असलेल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेर पहिल्या पटावर सोनिया देशमुख व सुचेत तालिकोटी यांच्यात फ्रेंच ओपनिंग पद्धतीने सुरुवात झालेल्या डावात अनुभव सोनियाने डावाच्या अंतिम पर्वात घोड्याच्या बदल्यात सुचेतचा हत्ती मिळवला व डावावर वर्चस्व मिळवले़ जादा प्याद्याच्या वजीर करीत डाव जिंकला़
Next
स लापूर: बीएमआयटी महाविद्यालय, बेलाटी येथे सोलापूर विद्यापीठांतर्गत सुरु असलेल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेर पहिल्या पटावर सोनिया देशमुख व सुचेत तालिकोटी यांच्यात फ्रेंच ओपनिंग पद्धतीने सुरुवात झालेल्या डावात अनुभव सोनियाने डावाच्या अंतिम पर्वात घोड्याच्या बदल्यात सुचेतचा हत्ती मिळवला व डावावर वर्चस्व मिळवले़ जादा प्याद्याच्या वजीर करीत डाव जिंकला़दुसर्या पटावर उदय वगरे व नमिता हांडे यांच्यातील गायको पियाने पद्धतीने सुरुवात झालेल्या डावात उदय वगरे याने नमिता हांडे हिचा वजीर कोंडीत पकडून फुकट मिळविला व सहज डाव जिंकला़तिसर्या पटावर आदित्य गुंडला, मिलिंद गोप यांच्यातील फ्रेंच ओपनिंग पद्धतीने सुरुवात झालेल्या डावाच्या मध्य पर्वात गोपने केलेल्या चुकीमुळे आदित्यला घोडा फुकटचा मिळाला व त्याने सहज विजय मिळविला़चौथ्या पटावर किरण अंकुशराव विरुद्ध अक्षय हंग यांच्यात झालेल्या डावात सुरुवातीलाच अक्षयने हत्तीच्या चुकीच्या खेळी रोखत स्वत:चा हत्ती गमावला़ त्यानंतर अनुभवी किरणने या संधीचा फायदा घेत सहज विजय मिळवला़इतर निकाल-प्रकाश अभंगे वि़वि़ सुभाष हम्मवार, हीना कौसर शेख वि़वि़ विवेक हिरवे, ओंकार बिराजदार वि़वि़ शुभम पाटील, महेश बनसोडे वि़वि़ मुकीर आहेरवाडी, कमरान शेख वि़वि़ महेश भोसले, आकाश बेरडे वि़वि़ आकाश बेरडे़