सोमदेव पावला

By admin | Published: September 15, 2014 02:16 AM2014-09-15T02:16:33+5:302014-09-15T02:16:33+5:30

भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू सोमदेव देववर्मनने लढवय्या लिएंडर पेस व रोहन बोपन्ना यांच्या कामगिरीपासून प्रेरणा

Somdev Pavala | सोमदेव पावला

सोमदेव पावला

Next

बंगलोर : भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू सोमदेव देववर्मनने लढवय्या लिएंडर पेस व रोहन बोपन्ना यांच्या कामगिरीपासून प्रेरणा घेत चमकदार कामगिरी केली आणि एकेरीच्या परतीच्या लढतीत सर्बियाचा अव्वल खेळाडू दुसान लाजोव्हिचची झुंज १-६, ६-४, ४-६, ६-३, ६-२ ने मोडून काढत भारताला डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत विश्व ग्रुप प्ले आॅफ लढतीत २-२ अशी बरोबरी साधून दिली.
सोमदेवने जवळजवळ ३ तास ४० मिनिटे रंगलेल्या लढतीत विश्व क्रमवारी त्याच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या लाजोव्हिचचा पराभव केला. भारताला या लढतीत पहिल्या दिवशी एकेरीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. पेस व बोपन्ना यांनी शनिवारी दुहेरीच्या लढतीत दोन सेट्सने पिछाडीवर पडल्यानंतर चमकदार कामगिरी करीत मॅरेथॉन लढतीत विजय मिळविला.
विश्व क्रमवारीत १४४ व्या स्थानावर असलेल्या सोमदेवने जागतिक क्रमवारीत ६१ व्या स्थानावर असलेल्या लाजोव्हिचचा पराभव केला. पहिला सेट गमाविणाऱ्या सोमदेवने त्यानंतर दमदार पुनरागमन केले. सोमदेवने विजयी गुण वसूल केल्यानंतर केएसएलटीए स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी जल्लोष केला.
पहिला सेट १-६ ने गमाविणाऱ्या सोमदेवने दुसरा सेट ६-४ ने जिंकत १-१ अशाी बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये लाजोव्हिचनने ४-६ ने बाजी मारली आणि २-१ अशी
आघाडी मिळविली. सोमदेवने त्यानंतर आक्रमक पवित्रा स्वीकारीत चौथा सेट ६-३ ने जिंकत २-२ अशी बरोबरी साधली. पाचव्या व निर्णायक सेटममध्ये सोमदेवने वर्चस्व गाजवित ६-२ ने सरशी साधत विजयावर शिक्कामोर्तब केले.
सोमदेव आणि लाजोव्हिच यांच्यादरम्यानची लढत रंगतदार ठरली. सोमदेवने स्थानिक चाहत्यांचे समर्थन व मायदेशातील परिस्थितीचा लाभ घेतला. लाजोव्हिच चौथ्या व पाचव्या सेटमध्ये थकलेला भासत होता, तर सोमदेवमध्ये प्रत्येक गुण वसूल केल्यानंतर नवा उत्साह संचारल्याची प्रचिती मिळत होती. पहिल्या सेट गमाविणाऱ्या सोमदेवने दुसऱ्या सेटमध्ये लाजोव्हिचला रॅली खेळण्यास भाग पाडले. त्यामुळे लाजोव्हिचने अनेक चुका केल्या. (वृत्तसंस्था)

Web Title: Somdev Pavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.