सायना तिस-या फेरीत

By admin | Published: August 27, 2014 02:28 AM2014-08-27T02:28:15+5:302014-08-27T02:28:15+5:30

राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेणारी भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवालने महिलांच्या एकेरीत रशियाच्या नतालिया पर्मिनोव्हाचा पराभव करुन विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला

Saina in third round | सायना तिस-या फेरीत

सायना तिस-या फेरीत

Next

कोपेनहेगन : राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेणारी भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवालने महिलांच्या एकेरीत रशियाच्या नतालिया पर्मिनोव्हाचा पराभव करुन विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या एकेरित राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून देशाचे नाव उंचावणाऱ्या भारताच्या पी़ कश्यपवर पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली़ मिश्र दुहेरीत मात्र अरुण विष्णू आणि अपर्णा बालन यांनी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला़
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण मिळविणाऱ्या कश्यपकडून या स्पर्धेतही विशेष कामगिरीची अपेक्षा होती; मात्र या अनुभवी खेळाडूला पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत जर्मनीच्या डिएटर डोम्के यांच्याकडून १ तास ७ मिनिटे रंगलेल्या लढतीत २६-२४, १३-२१, २१-१८ अशा फरकाने मात खावी लागली़
स्पर्धेतील मिश्र दुहेरी लढतीत मात्र भारताच्या अरुण विष्णू आणि अपर्णा बालन यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना ब्राझीलच्या ह्युगो आर्थुगो आणि फाबियाना सिल्वा या जोडीवर अवघ्या २३ मिनिटांत २१-१९, २१-१४ अशा फरकाने विजय मिळवून स्पर्धेच्या पुढच्या फेरीत मजल मारली़
पुरुष दुहेरी लढतीत प्रणव चोपडा आणि अक्षय देवलकर या भारतीय जोडीने हाँगकाँगच्या युन लुंग चान आणि चुन हेई या जोडीचा ५३ मिनिटांत २१-१९, १६-२१, २-२० असा फडशा पाडून स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत आपले स्थान निश्चित केले़
पुरुष एकेरीत जपानच्या केनिची तागोने सामन्यातून माघार घेतल्यामुळे भारताच्या अजय जमयरामला स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश मिळाला़ महिला दुहेरीत प्राजक्ता सावंत आणि आरती सुनील यांनी माघार घेतल्यामुळे थायलंडच्या पुत्ती सुपाजीराकुल सापसिरी आणि तिरातानचाई यांना बाय मिळाला़ (वृत्तसंस्था)

Web Title: Saina in third round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.