सचिन, कोहलीला जमलं नाही ते महिला क्रिकेटरने केलं

By admin | Published: February 27, 2017 04:51 PM2017-02-27T16:51:32+5:302017-02-27T17:04:34+5:30

सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, ब्रायन लारा, विराट कोहली अशा दिग्गज खेळाडूंनाही हा विक्रम करता आला नाही

Sachin and Kohli did not get the woman cricketer did | सचिन, कोहलीला जमलं नाही ते महिला क्रिकेटरने केलं

सचिन, कोहलीला जमलं नाही ते महिला क्रिकेटरने केलं

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू एमी सेटर्थवेटने एक विक्रम केला आहे.  सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, ब्रायन लारा यांनाही हा विक्रम करता आला नाही, तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या विक्रमाच्या जवळही पोहोचलेला नाही.  अशा महान क्रिकेटपटूंना जमली नाही अशी किमया तिने करून दाखवली आहे. 
 
सलग चार एकदिवसीय सामन्यांमध्ये 4 शतकं ठोकण्याचा विक्रम तिने केला आहे. यासोबत महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटर ठरली. मात्र, पुरूषांच्या क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा माजी विकेटकिपर कर्णधार कुमार संगकाराने सलग चार वन डेमध्ये सलग चार शतक करण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे संगकाराच्या विक्रमाशी तिने बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धचं हे शतक तिच्या कारकिर्दीतील सहावं शतक ठरलं. 
 
ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात एमीने 102 धावांची खेळी केली. या बळावर किवींनी कांगारूंचा 5 विकेटने पराभव केला. यापुर्वी  नोव्हेंबर 2016 मध्ये पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेत तिने सलग तिन शतकं ठोकली होती.  
 
गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुस-या सामन्यात पाचवं शतक ठोकून संगकाराचा विक्रम मोडण्याची संधी एमीकडे आहे.
 

Web Title: Sachin and Kohli did not get the woman cricketer did

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.