भारताचे दोन अ‍ॅथलिट स्पर्धेबाहेर, सीजीएफच्या निर्णयाला भारत देणार आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:02 AM2018-04-14T02:02:26+5:302018-04-14T02:02:26+5:30

‘नो नीडल पॉलिसी’चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून भारताच्या दोन अ‍ॅथलिट्सना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

Outside India's two athletes, the CGF decision will challenge India | भारताचे दोन अ‍ॅथलिट स्पर्धेबाहेर, सीजीएफच्या निर्णयाला भारत देणार आव्हान

भारताचे दोन अ‍ॅथलिट स्पर्धेबाहेर, सीजीएफच्या निर्णयाला भारत देणार आव्हान

Next

गोल्ड कोस्ट : ‘नो नीडल पॉलिसी’चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून भारताच्या दोन अ‍ॅथलिट्सना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. वॉकथॉनपटू के. टी. इरफान आणि तिहेरी उडीतील व्ही. राकेशबाबू अशी बाहेर करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे आहेत. या दोघांनाही मायदेशी परत पाठविण्यात आले आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने याप्रकरणी चौकशी सुरू केली असून भारतीय आॅलिम्पिक संघटनेने(आयओए) राष्टÑकुल क्रीडा महासंघाच्या निर्णायाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
सीजीएफ अध्यक्ष लुई मार्टिन यांनी राकेशबाबू आणि इरफान यांना तात्काळ प्रभावाने स्पर्धेबाहेर काढल्याची घोषणा केली. दोघांचेही अ‍ॅक्रिडेशन १३ एप्रिलला सकाळी ९ वाजेपासून रद्द करण्यात आले. दोघांनाही क्रीडाग्राममधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. दोन्ही खेळाडू तात्काळ विमानाने परत जातील याची खात्री करण्यास भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनला सांगितले आहे. एएफआयने चौकशी सुरू केली असून खेळाडू दोषी आढळल्यास कठोर शिक्षा होईल, असे सांगितले. इरफानची २० किमी पायी चालण्याची शर्यत आटोपली आहे. तो १३ व्या स्थानी होता. राकेशबाबूने तिहेरी उडीत पात्रता फेरीत १२ व्या स्थानासह अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. हे डोपिंग प्रकरण नसल्याचेही सीजीएफने स्पष्ट केले. याआधी, एका भारतीय बॉक्सरच्या खोलीत सूई आढळल्याने स्पर्धा सुरू होण्याआधी फजिती झाली होती. काल सीजीएफ वैद्यकीय आयोगाची नोटीस मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (वृत्तसंस्था)
>निर्णयाला आव्हान देणार
‘‘आम्ही काही निर्णयाच्या विरोधात आहोत. आपल्या सिनियर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आव्हान देणार आहोत. आमच्या खेळाडूंवर संशयापोटी बंदी घालण्यात आली आहे.’’
- नामदेव शिरगावकर, भारतीय पथकाचे व्यवस्थापक.
एएफआय अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी साईचे माजी सचिव बी. के. सिन्हा यांच्या नेतृत्वात होईल. समितीत एक डॉक्टर आणि अधिकाºयाचा समावेश असेल. क्लीन स्पोर्टस् इंडियाचे समन्वयक बीव्हीपी राव म्हणाले,‘हे प्रकरण भारताला बदनाम करणारे असल्याने सविस्तर चौकशी व्हावी. क्रीडा मंत्रालय आणि पंतप्रधानांनी दोषींवर कठोर कारवाई करायला हवी.’
>आजचे महत्त्वाचे सामने
नेमबाजी : पुरूष ५० मीटर रायफल थ्री पोझीशन - चैन सिंह, संजीव राजपूत, पुरुष ट्रॅप - केनान चेनाई, मानवजीत सिंह संधू,
अ‍ॅथलेटिक्स - भाला फेक नीरज चोप्रा, विपीन कसाना, तिहेरी उडी पुरूष - अरपिंदर सिंह, १५०० मीटर अंतिम फेरी जिनसन जानसन, महिला चार बाय ४०० मीटर रिले. पुरूष चार बाय ४०० मीटर रिले.
हॉकी कांस्य पदक लढत - भारत विरुद्ध इंग्लंड (महिला व पुरुष)
महिला ४८ किलो मुष्टियुद्ध फायनल - मेरी कोम, पुरूष ४९ किलो अमित फांगल, ५२ किलो - गौरव सोलंकी, पुरूष ६० किलो मनिष कौशिक, पुरूष ७५ किलो - विकास कृष्णन, पुरूष ९१ किलो - सतीश कुमार वि. फ्रेजर क्लार्क.

Web Title: Outside India's two athletes, the CGF decision will challenge India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.