फक्त सायनाच जिंकली

By admin | Published: May 29, 2015 01:45 AM2015-05-29T01:45:39+5:302015-05-29T01:45:39+5:30

स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल वगळता आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजमध्ये सर्व भारतीय खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले.

Only Saina won | फक्त सायनाच जिंकली

फक्त सायनाच जिंकली

Next

सिडनी : स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल वगळता आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजमध्ये सर्व भारतीय खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सायना हिने चीनच्या नवव्या मानांकित सुन यू हिचा १ तास १८ मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत २१-१९, १९-२१, २१-१४ असे पराभूत केले.
गेल्या चारपैकी तीन लढतींत सुन हिला पराभूत करणाऱ्या सायनाने ब्रेकपर्यंत ११-६ अशी आघाडी घेतली होती; परंतु सुन हिने लवकरच मुसंडी मारताना स्कोअर १८-१८ असा केला. सायना दुसऱ्याच गेममध्ये जिंकली असती. कारण, तिने १३-७ अशी ६ गुणांची आघाडी घेतली होती; परंतु सुन हिने मुसंडी मारताना १३-१३ अशी बरोबरी साधली.
सायनाने पुन्हा १८-१५ अशी आघाडी घेतली; परंतु सुन हिने तीन गुण घेताना पुन्हा अंतर १८-१९ असे केले. निर्णायक गेममध्ये सायनाने सुन हिला मुसंडी मारण्याची संधी दिली नाही आणि लवकरच १२-४ अशी आघाडी घेतली. सुनने खूप प्रयत्न केला; परंतु सायनाने या वेळस कोणतीही संधी न देता विजय मिळवला.जागतिक क्रमवारीतील चौथा मानांकित खेळाडू श्रीकांत आणि २0१0 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन जोडी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांचे आव्हान संपुष्टात आले.चौथ्या मानांकित प्राप्त श्रीकांत चीनच्या तियान हुवेई याच्याकडून २१-१८, १८-१७, १३-२१ असा पराभूत झाला, तर चौथ्या मानांकित ज्वाला आणि अश्विनी या जोडीला महिला दुहेरीत इंडोनेशियाच्या नित्या के. माहेश्वरी आणि ग्रेसिया पोली यांनी २१-१४, २१-१0 असे नमवले. (वृत्तसंस्था)

आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाची लढत आता दोन वेळेसची आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियन शिजियान वाँग हिच्याशी होईल. तिचे सायनाविरुद्ध ११ लढतींत विजय-पराभवाचे रेकॉर्ड ६-५ असे आहे.

Web Title: Only Saina won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.