क्रीडा संस्कृतीला फक्त सरकार प्रोत्साहन देऊ शकत नाही,अन्य जबाबदारी स्वीकारण्यास तयार : गोयल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 01:11 AM2017-09-04T01:11:17+5:302017-09-04T01:11:32+5:30

क्रीडामंत्री म्हणून आपला कार्यकाळ सफल राहिला, तसेच देशात क्रीडा संस्कृतीला सरकार एकटेच प्रोत्साहन देऊ शकत नसल्याचे मत मावळते क्रीडामंत्री विजय गोयल यांनी व्यक्त केले.

Only the government can not promote sports culture, others are ready to accept responsibility: Goyal | क्रीडा संस्कृतीला फक्त सरकार प्रोत्साहन देऊ शकत नाही,अन्य जबाबदारी स्वीकारण्यास तयार : गोयल

क्रीडा संस्कृतीला फक्त सरकार प्रोत्साहन देऊ शकत नाही,अन्य जबाबदारी स्वीकारण्यास तयार : गोयल

Next

नवी दिल्ली : क्रीडामंत्री म्हणून आपला कार्यकाळ सफल राहिला, तसेच देशात क्रीडा संस्कृतीला सरकार एकटेच प्रोत्साहन देऊ शकत नसल्याचे मत मावळते क्रीडामंत्री विजय गोयल यांनी व्यक्त केले.
गोयल यांना क्रीडा मंत्रालयाऐवजी संसदीय कामकाज राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. गोयल म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांना मला अन्य जबाबदारी देण्याची इच्छा आहे, तर मला त्याचा स्वीकार करावा लागेल. जर माझे कामकाज खराब राहिले असते तर त्यांनी मला मंत्रालयातून हटवले असते. मात्र माझा कार्यकाळ यशस्वी राहिला आहे. त्यामुळे मला दुसºया मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.’ गोयल यांनी गेल्या १३ महिन्यांत भारतीय क्रीडा व्यवस्थेत सकारात्मक बदल आणण्यासाठी काम केले. आम्हाला वाटते, की देशातील क्रीडा संस्कृतीचा विकास व्हावा, मात्र हे काम सरकार एकटीच करू शकणार नाही. पालक आणि शिक्षकांनी मुलांना खेळांबाबत प्रोत्साहन द्यायला हवे. (वृत्तसंस्था)

Web Title: Only the government can not promote sports culture, others are ready to accept responsibility: Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.