मोदींकडून श्रीनिवासन ‘लक्ष्य’

By admin | Published: June 30, 2015 02:14 AM2015-06-30T02:14:53+5:302015-06-30T02:14:53+5:30

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी राजकारण्यानंतर आता क्रिकेटमधील कट्टर विरोधी आयसीसी चेअरमन एन. श्रीनिवासन यांना लक्ष्य केले.

Modi targets Srinivasan | मोदींकडून श्रीनिवासन ‘लक्ष्य’

मोदींकडून श्रीनिवासन ‘लक्ष्य’

Next

नवी दिल्ली : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी राजकारण्यानंतर आता क्रिकेटमधील कट्टर विरोधी आयसीसी चेअरमन एन. श्रीनिवासन यांना लक्ष्य केले. एका बिल्डरकडून लाच घेण्याचा आरोप असलेल्या स्वत:च्या चेन्नई सुपरकिंग्स संघातील तीन खेळाडूंना श्रीनिवासन पाठिशी घालत असल्याचा मोदींनी खुलासा केला.
बनावट दस्तावेजांवर ब्रिटेनमध्ये पोहोचल्यामुळे मोदी वादात अडकले. याप्रकरणी त्यांनी अंमलबजावणी संचलनालयावर(ईडी) तोंडसुख घेतले. मनीलॉन्ड्रिंगच्या आरोपाचे पुरावे सादर करण्याचे आव्हान त्यांनी ईडीला दिले. लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मोदींनी भारतात परतण्याची शक्यता धुडकावून लावताना मला सरकारच्या आश्वासनांवर नव्हे तर स्वत:वर विश्वास असल्याचे स्पष्ट करीत माझ्या जीवाला धोका नसल्याची खात्री पटल्यानंतरच भारतात परत येईल, असे ठासून सांगितले.
लंडन येथे एका भारतीय वृत्त वाहिनीशी बोलताना ते पुढे
म्हणाले, ‘आयसीसी चेअरमन श्रीनिवासन काय करीत आहेत? चेन्नई सुपरकिंग्सच्या तीन खेळाडूंचा बचाव! माझ्यासह सर्वच भारतीय या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ इच्छितात. श्रीनिवासन हे विश्वासू व्यक्ती असेल तर क्रिकेटला परमेश्वरच वाचवू शकेल.’’
एका बिल्डरने तीन खेळाडूंना लाच दिल्याची तक्रार ई मेलद्वारे मोदी यांनी जून २०१३ मध्ये पाठविल्याच्या वृत्तास आयसीसीने काल दुजोरा दिला. त्यावेळी श्रीनिवास हे चेन्नईचे मालक होते. आता त्यांनी मालकी हक्क सोडला. हा मेल भ्रष्टाचारविरोधी पथकाला पाठविण्यात आला. त्यांनी त्यावर कारवाई केली शिवाय बीसीसीआयलादेखील माहिती दिली. (वृत्तसंस्था)

Web Title: Modi targets Srinivasan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.