मंुबईकडून पदकांचे शतक

By admin | Published: June 1, 2014 12:32 AM2014-06-01T00:32:08+5:302014-06-01T00:32:08+5:30

आज समारोप : राज्य ज्युनियर जलतरण स्पर्धा

Medal of the Century | मंुबईकडून पदकांचे शतक

मंुबईकडून पदकांचे शतक

Next
समारोप : राज्य ज्युनियर जलतरण स्पर्धा
नाशिक : येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय ज्युनियर जलतरण स्पर्धेचा उद्या समारोप असून, गेल्या तीन दिवसांमध्ये मंुबईच्या जलतरणपटूंनी जोरदार मुसंडी घेत ५७ सुवर्णांसह पदकांचे शतक पूर्ण केले तर यजमान नाशिककडून नचिकेत बुझरुक याने आज पुन्हा दोन सुवर्ण पटकावत वैयक्तिक चार सुवर्णपदके पटकावली आहेत.
नाशिकरोडच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथे गेल्या तीन दिवसांपासून राज्यस्तरीय ज्युनियर जलतरण स्पर्धा सुरू आहेत. सदरच्या स्पर्धा राज्य हौशी जलतरण संघटना, नाशिक जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या असून स्पर्धेचा उद्या समारोप आहे.
विविध जलतरण स्पर्धांमधून मुंबईच्या जलतरणपटंूनी आजही निर्विवाद वर्चस्व राखत १६ सुवर्ण पदके पटकावत एकूण ४१ पदके पटकावली तर सुवर्णांचे अर्धशतक केले असून एकूण पदतालिकेत १३७ पदकांसह अग्रस्थान कायम राखले. २१ सुवर्णांसह ७२ पदके पटकावत पुणे दुसर्‍या, ठाणे तिसर्‍या तर नाशिक चौथ्या स्थानी आहेत. पुणे-मंुबईच्या जलतरणपटूंमध्ये आज चुरशीचे सामने झाले. या तुलनेत यजमान नाशिककडून फक्त नचिकेत बुझरुकचीच चमकदार कामगिरी झाली. त्याने आजही २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक पटकावले तर माणिक चतुर्भुज, सिद्धी कोतवाल यांनी फ्रिस्टाईलमध्ये रौप्य पदक पटकावले. श्रेयस वीरगावकरने कांस्य पदक पटकावले.

पदतालिका
जिल्हा सुवर्णरौप्यकांस्यएकूण
मंुबई ५७४४३६१३७
पुणे २१२८२३७२
ठाणे ९१०९२८
नाशिक ५४७१६

स्पर्धेचा निकाल : पदक विजेते खेळाडू सुवर्ण, रौप्य, कांस्य या क्रमाने...
२०० मीटर बटरफ्लाय मुले : पार्थ राने (पुणे), जॉशन स्मिथ (मुंबई), निकोलन फर्नांडिस (मंुबई)
२०० मीटर बटरफ्लाय मुली : आकांक्षा बुचडे (पुणे), नूपुर कदम (ठाणे), ज्योती पाटील (मुंबई)
२०० मीटर बटरफ्लाय मुले : नचिकेत बुझरुक (नाशिक), वेदांत खांडेपारकर (मुंबई), नील रॉय (मंुबई)
२०० मीटर बटरफ्लाय मुली : त्रिशा कारखानीस (ठाणे), सिद्धी कारखानीस (पुणे), राधिका गावडे (मंुबई)
५० मी. फ्रिस्टाईल मुले : विराज प्रभू (ठाणे), इशान बिमाणी (मुंबई), निमिश मुळे (वर्धा)
५० मी. फ्रिस्टाईल मुली : त्रिशा बिमाणी (मुंबई), जिया कामटे (मंुबई), आकांक्षा बुचडे (पुणे)
५० मी. फ्रिस्टाईल मुले : नचिकेत बुझरुक (नाशिक), दिव व्होरा (मंुबई), मिहीर आंब्रे (पुणे)
५० मी. फ्रिस्टाईल मुली : सना भाभा (मंुबई), मल्लिका बैखरीकर (मुंबई), सदानी धुरी (पुणे)
१०० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुले : धु्रव पटेल (ठाणे), करण धर्माधिकारी (कोल्हापूर), वरद कुलकर्णी (मुंबई)
१०० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुली : इशा खाडी (ठाणे), मनस्वी मोहिते (नागपूर), इशा राडिया (मंुबई)
५० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुले : सिद्धार्थ संख्ये (मुंबई), विराज प्रभू (ठाणे), ओमकार नेहेते (मंुबई)
५० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुली : स्वराली कोकीळ (पुणे), अंतरा अग्रवाल (मंुबई), ऋतुजा देसाई (कोल्हापूर)
५० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुले : ख्रिस फर्नांडिस (मुंबई), दिव व्होरा (मुंबई), आर्यन केदारे (ठाणे)
५० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुली : आदिती नाझरे (मंुबई), अपेक्षा शेरेराव (ठाणे), युक्ता वखारिया (पुणे)
५० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुले : अथर्व ओक (पुणे), इंद्रनिल भिडे (पुणे), यश पत्की (मंुबई)
५० मी. बटरफ्लाय मुली : केनिशा गुप्ता (मंुबई), अन्या त्यागी (ठाणे), निशा अग्रवाल (पुणे)
५० मी. बटरफ्लाय मुले : अन्वेश प्रसादे (पुणे), मीत मखिजा (मंुबई), अरमान सिखा (मंुबई)

(जोड बातमी आहे....)

Web Title: Medal of the Century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.