लोंग चेन, कॅ रोलिना नवे चॅम्पियन

By admin | Published: September 1, 2014 01:48 AM2014-09-01T01:48:23+5:302014-09-01T01:48:23+5:30

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज चीनचा लोंग चेन आणि स्पेनची कॅरोलिना मारिन यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात एकेरीचे विजेतेपद पटकावले.

Long Chen, K Rollina New Champion | लोंग चेन, कॅ रोलिना नवे चॅम्पियन

लोंग चेन, कॅ रोलिना नवे चॅम्पियन

Next

कोपेनहेगन : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज चीनचा लोंग चेन आणि स्पेनची कॅरोलिना मारिन यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात एकेरीचे विजेतेपद पटकावले.
लोंग चेन याने अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा मलेशियाचा खेळाडू ली चोंग वेई याचा कडवा प्रतिकार २१-१९, २१-१९ने मोडून काढला. स्पर्धेत दुसरे मानांकन लाभलेल्या चेनने ही अटीतटीची लढत १ तास ९ मिनिटांत जिंकून प्रथमच विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. याआधी कारकिर्दीत ली चोंग वेईविरुद्ध चेन ८-९ असा माघारलेला होता. आजची प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकून या चिनी खेळाडूने लीसारख्या दिग्गज खेळाडूविरुद्ध ९-९ अशी बरोबरी साधली आहे.
महिला एकेरीमध्येने कारकीर्दीतील संस्मरणीय कामगिरी करताना जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू व आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या जुईरुई लीची झुंज तीन गेम्समध्ये मोडून काढताना महिला एकेरीत जेतेपदाचा मान मिळविला. नववे मानांकन प्राप्त मारिनने एक तास १८ मिनिटे रंगलेल्या अंतिम लढतीत जुईरईचा १७-२१, २१-१७, २१-१८ ने पराभव करीत प्रथमच विश्वकप स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला.
मारिनने उपांत्य फेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधूचा पराभव केला होता. मारिनला यापूर्वी जुईरईविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन्ही लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. पहिला गेम १७-२१ ने गमाविल्यानंतर स्पेनची खेळाडू पुनरागमन करेल, अशी कुणाला अपेक्षा नव्हती, पण मारिनने सर्व शक्यता फेटाळून लावताना दुसरा गेम २१-१७ ने जिंकत १-१ अशी बरोबरी साधली.
तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये मारिनने २१-१८ ने बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली. (वृत्तसंस्था)

Web Title: Long Chen, K Rollina New Champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.