अक्षर, मिलर ठरले किलर; पंजाब विजयी

By admin | Published: September 21, 2014 01:37 AM2014-09-21T01:37:20+5:302014-09-21T01:37:20+5:30

डेव्हिड मिलर व अक्षर पटेलच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाब किंग्ज इल्ेव्हनने बार्बाडोस ट्रायडेंटसचा चार विकेटनी पराभव केला.

The letter, the miller was the killer; Punjab won | अक्षर, मिलर ठरले किलर; पंजाब विजयी

अक्षर, मिलर ठरले किलर; पंजाब विजयी

Next
मोहाली : डेव्हिड मिलर व अक्षर पटेलच्या फटकेबाजीच्या जोरावर  पंजाब किंग्ज इल्ेव्हनने  बार्बाडोस ट्रायडेंटसचा चार विकेटनी पराभव केला. चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पर्धेतील ब गटातील सामन्यात बार्बाडोसने 6 बाद 174 धावांचे आव्हान ठेवले होते.
पंजाबने नाणोफेक जिंकून बार्बाडोसला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. पंजाबचा सलामीविर मुनाविराने 26 चेंडूत पाच चौकार व तीन षटकाराच्या साह्याने 5क्  धावा केल्या. रीफरने  नाबाद 42 धावा केल्या.  पहिल्या पाच षटकांतच बार्बाडोसने 54 धावा केल्या होत्या. शेवटच्या काही षटकात रिफरने जोरदार फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या करुन दिली. पंजाबकडून परविंदर अवानाने   46 धावांत तीन, थिसारा परेराने दोन व अनुरीत सिंगने एक बळी घेतला.
174 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबने आपली सुरुवात सावध केली. विरेंद्र सेहवाग व मनन व्होरा यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागिदारी केली. विरेंद्र सेहवाग 31 धावांवर मेंडिसच्या गोलंदाजीवर बाद झाला तर मनन व्होरा 27 धावांवर बाद झाला.
वृद्धीमान सहाने 14 तर ग्लेन मॅक्सवेलने 16 धावा केल्या. जॉर्ज बेली (क्7) व थिसारा परेरा (क्) धावांवर बाद झाल्यामुळे पंजाब संघ अडचणीत आला होता.
 डेव्हिड मिलरने एका बाजूने किल्ला लढवणो सुुरु ठेवले होते. त्याने चौफेर फटकेबाजी करत नाबाद 46 धावा केल्या. अक्षर पटेलने मिलरला चांगली साथ दिली त्याने नाबाद 23 धावा केल्या. शेवटचे दोन चेंडू शिल्लक असताना पंजाबने बार्बाडोसचे आव्हान पूर्ण केले.
 

 

Web Title: The letter, the miller was the killer; Punjab won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.