खो-खो: महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 06:33 PM2019-01-27T18:33:09+5:302019-01-27T18:33:59+5:30

नितेश रूके आणि उत्तम सावंत यांचा तुफानी खेळ

Kho-Kho: Mahatma Gandhi Sports Academy won title | खो-खो: महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी अजिंक्य

खो-खो: महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी अजिंक्य

googlenewsNext

मुंबई: विद्यार्थी क्रीडा केंद्राने त्यांच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने परळच्या लालमैदानातील गुरूवर्य कै. विवेकानंद पैगांवकर क्रीडानगरीत  आयोजित पुरूषांच्या निमंत्रित राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो . अकॅडेमीने विजेतेपद पटकावले.

शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो . अकॅडेमी व सांगलीच्या कवठेपिराणस्थित हिंदकेसरी या महाराष्ट्रातील दोन अग्रणी खो-खो संघातील अंतिम सामना अपेक्षेप्रमाणे उत्कंठावर्धक ठरला. महात्माने हिंदकेसरीचे कडवे आव्हान (९-८,६-६) १५-१४ असे केवळ १ गुणाने मोडून काढीत विद्यार्थी क्रीडा केंद्राच्या गजानन वाईरकर व  यशवंत नाईक यांच्या गौरवार्थ आयोजित ५५व्या खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

सांगलीच्या हिंदकेसरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. मध्यंतराला महात्माकडे एका गुणाची आघाडी होती. महात्माच्या नितेश रूकेने पहिल्या डावात १.५० मि व दुस-या डावात २ मिनीटे दमदार संरक्षण करून सामना महात्माच्या बाजूने झुकवला. नितेशला दिपक माधव (१.४० मि व १.३० मि), प्रतिक देवरे (१.४० मि व १.२० मि) व ॠषिकेश मुर्चावडेने (१ मि व १.३० मि) संरक्षणात सुरेख साथ दिली तर आक्रमणाची बाजू ओमकार सोनावणेने ४ गडी बाद करून सांभाळली. हिंदकेसरीच्या अमोल जाधव (१.२० मि, १.५० मि व ३ गडी), राहूल तामगावे (१.५० मि) , उत्तम सावंत (२.२० मि) व मिलिंद चावरेकर (१.४० मि व ३ गडी), युवराज जाधव (४ गडी) या अनुभवी खेळाडूंनी सामना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

४ फुट ११ इंच गटात पारंपारिक प्रतिस्पर्धी युवक क्रीडा मंडळ व यजमान विद्यार्थी क्रीडा मंडळ यांच्यातील अटीतटीच्या अंतिम सामन्यात युवकने (४-३,२-२) ६-५ अशी १ गुणानी बाजी मारली.

Web Title: Kho-Kho: Mahatma Gandhi Sports Academy won title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kho-Khoखो-खो