भारताचे ‘वर्ल्ड ग्रुप’चे स्वप्न भंगले

By admin | Published: September 16, 2014 01:45 AM2014-09-16T01:45:12+5:302014-09-16T01:45:12+5:30

लिएंडर पेस व रोहन बोपन्ना यांनी दुहेरीत विजय मिळविल्यानंतर व सोमदेव देववर्मनने पाच सेट्सर्पयत रंगलेल्या लढतीत सरशी साधल्यामुळे भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या;

India's dream of 'World Group' breaks | भारताचे ‘वर्ल्ड ग्रुप’चे स्वप्न भंगले

भारताचे ‘वर्ल्ड ग्रुप’चे स्वप्न भंगले

Next
डेव्हिस कप टेनिस : युकी भांबरी पराभूत; सर्बियाची 3-2 ने सरशी 
बंगलोर : लिएंडर पेस व रोहन बोपन्ना यांनी दुहेरीत विजय मिळविल्यानंतर व सोमदेव देववर्मनने पाच सेट्सर्पयत रंगलेल्या लढतीत सरशी साधल्यामुळे भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण युकी भांबरीला निर्णायक लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताचे विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळविण्याचे स्वप्न भंगले. निर्णायक सामन्यात युकीला सर्बियाच्या फिलिप क्राजोव्हिचविरुद्ध आज, सोमवारी 3-6, 4-6, 4-6 ने पराभव पत्करावा लागला. डेव्हिस कप विश्व ग्रुप प्ले ऑफ लढतीत भारताला सर्बियाविरुद्ध 3-2 ने पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे भारताला पुढील वर्षी आशिया-ओसनिया ग्रुपमध्ये पुन्हा परतावे लागणार आहे. 
भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू सोमदेवने त्याच्यापेक्षा क्रमवारीत वरचे स्थान असलेल्या दुसान लाजोव्हिचचा काल, रविवारी एकेरीच्या परतीच्या लढतीत 1-6, 
6-4, 4-6, 6-3, 6-2 ने पराभव करीत भारताला 2-2 अशी बरोबरी साधून दिली होती. त्यानंतर भारताची नजर युकीवर केंद्रित झाली होती. 
काल युकीने पहिला सेट 3-6 ने गमाविल्यानंतर पावसाचा व्यत्यय निर्माण झाला. पुन्हा खेळ सुरू झाला त्यावेळी युकीने काही दज्रेदार फटके मारताना क्राजोव्हिचविरुद्ध लढत देण्यास सक्षम असल्याची प्रचिती दिली. दुस:या सेटमध्ये 4-4 अशी बरोबरी असताना युकीला सूर गवसल्याचे संकेत मिळत होते; पण पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे सामना स्थगित करण्यात अला. उद्या, सोमवारी सामना प्रारंभ झाल्यानंतर क्राजोव्हिचने नववा गेम जिंकत 5-4 अशी आघाडी घेतली. क्राजोव्हिचने दहाव्या गेममध्येही वर्चस्व गाजवित 6-4 ने सेट जिंकला व 2-क् अशी आघाडी घेतली. 
दुसरा सेट गमाविल्यानंतर युकीने सामन्यात परतण्यासाठी संघर्षपूर्ण खेळ केला; क्राजोव्हिचपुढे त्याचे प्रयत्न अपुरेच पडले. संघर्षपूर्ण खेळल्या गेलेल्या तिस:या सेटमध्ये क्राजोव्हिचने 6-4ने बाजी मारत विजयावर शिक्कामोर्तब केले. 
एकूण दोन तास सहा मिनिटे रंगलेल्या या लढतीत युकीने 66 टाळण्याजोग्या चुका केल्या, तर चार दुहेरी चुका केल्या. युकीने या लढतीत 34 विनर्स व चार एस लगाविले, तर क्राजोव्हिचने 24 विनर्स लगाविले. मोक्याच्या क्षणी गुण गमाविल्यामुळे युकीला पराभव स्वीकारावा लागला. क्राजोव्हिचने यापूर्वी एकेरीमध्ये सोमदेवचा पराभव केला होता.
2क्1क् चा चॅम्पियन व गत उपविजेत्या सर्बिया संघाने विश्व ग्रुपमधील आपले स्थान कायम राखले. (वृत्तसंस्था)
 
4काल पावसाच्या व्यत्ययामुळे युकीची लढत थांबविण्यात आली होती. त्यावेळी युकीने पहिला सेट 3-6 ने गमाविला होता, तर दुस:या सेटमध्ये उभय खेळाडूंदरम्यान 4-4 अशी बरोबरी होती. आज दुपारी 12च्या सुमारास प्रारंभ झालेल्या या लढतीत युकीने संघर्ष केला; पण क्रोजव्हिचचे आव्हान मोडून काढण्यात तो अपयशीच ठरला.
4एकेरीमध्ये जागतिक क्रमवारीत 153 व्या स्थानावर असलेल्या युकीवर निर्णायक लढतीत विजय मिळविण्याचे दडपण होते; पण भारतीय खेळाडूला स्थानिक चाहत्यांचा पाठिंबा लाभला असला तरी त्याला अपेक्षा पूर्ण करता आल्या नाही. 53 मिनिटे रंगलेल्या दुस:या सेटमध्ये युकीने 28 टाळण्याज्योग्या चुका, तर प्रतिस्पर्धी खेळाडूने केवळ 13 टाळण्याजोग्या चुका केल्या. 

 

Web Title: India's dream of 'World Group' breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.