भारतीयांचा पुन्हा एकदा क्लीन स्वीप; प्रकाश, अमनप्रीत, जितू चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:16 AM2017-11-04T00:16:12+5:302017-11-04T00:16:33+5:30

प्रकाश नांजप्पा, अमनप्रीतसिंग आणि जितू राय यांनी राष्ट्रकुल नेमबाजीच्या चौथ्या दिवशी ५० मीटर पिस्तूल प्रकारात क्लीन स्वीप करीत तिन्ही पदक जिंकली.

Indians clean once again; Light, Amanpreet, Jitu shine | भारतीयांचा पुन्हा एकदा क्लीन स्वीप; प्रकाश, अमनप्रीत, जितू चमकले

भारतीयांचा पुन्हा एकदा क्लीन स्वीप; प्रकाश, अमनप्रीत, जितू चमकले

Next

गोल्ड कोस्ट : प्रकाश नांजप्पा, अमनप्रीतसिंग आणि जितू राय यांनी राष्ट्रकुल नेमबाजीच्या चौथ्या दिवशी ५० मीटर पिस्तूल प्रकारात क्लीन स्वीप करीत तिन्ही पदक जिंकली.
प्रकाशने २२२.४ गुणांसह सुवर्ण, अमनप्रीतने रौप्य आणि जितूने कांस्य जिंकले. पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात आॅलिम्पिक कांस्य विजेता गगन नारंग याला रौप्य आणि स्वप्निल कुसाले याला कांस्य पदक मिळाले. त्याआधी महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात अन्नूराजसिंग हिने कांस्य जिंकले. विशेष म्हणजे याआधी भारतीय पिस्तूल नेमबाजांनी दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारातही क्लीन स्वीप केले होते. शाहजार रिझवीने सुवर्ण, ओकांरसिंग याने रौप्य आणि जितू रायने कांस्य जिंकले होते.
अनुभवी नेमबाज ४१वर्षीय प्रकाशने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे. याआधी त्याला २०१४ साली झालेल्या आशियाई क्रीडा व २०१३ साली झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेच्या १० मीटर प्रकारात कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
दरम्यान, स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हिना सिध्दूने १० मीटर एअर पिस्तूल गटात सुवर्ण जिंकले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Indians clean once again; Light, Amanpreet, Jitu shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.