भारतीय संघाला डिफेन्स मजबूत करण्याची गरज : सरदार

By admin | Published: July 7, 2015 12:54 AM2015-07-07T00:54:27+5:302015-07-07T00:54:27+5:30

संघाला जर आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवायचे असेल, तर आपला डिफेन्स मजबूत करावा लागेल. ब्रिटनविरुद्ध कांस्यपदकाच्या लढतीत भारताचा बचाव ढेपाळला होता.

India needs to strengthen defense: Sardar | भारतीय संघाला डिफेन्स मजबूत करण्याची गरज : सरदार

भारतीय संघाला डिफेन्स मजबूत करण्याची गरज : सरदार

Next

एंटवर्प : ब्रिटनकडून १-५ अशा मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग याने म्हटले, की संघाला जर आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवायचे असेल, तर आपला डिफेन्स मजबूत करावा लागेल.
ब्रिटनविरुद्ध कांस्यपदकाच्या लढतीत भारताचा बचाव ढेपाळला होता. त्यामुळे भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
सरदार म्हणाला, ‘‘आम्हाला आमचा खेळ उंचावण्याची आवश्यकता आहे आणि डिफेन्स हा त्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.’’ ब्रिटनला पाच गोल करू दिले, याचेही शल्य सरदार सिंगला आहे. भारतीय पुरुष संघाविरुद्ध ब्रिटनचा हा सर्वांत मोठा विजय आहे. त्याआधी ब्रिटनने सेऊल आॅलिम्पिकच्या सुरुवातीच्या फेरीत भारताला ३-० असे पराभूत केले होते. ब्रिटन संघाने याआधी भारताविरुद्ध एकदाच चार गोल लंडन येथे २०१२ आॅलिम्पिकदरम्यान केले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: India needs to strengthen defense: Sardar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.