राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा ऐतिहासिक वारसा

By admin | Published: January 28, 2015 02:10 AM2015-01-28T02:10:48+5:302015-01-28T02:10:48+5:30

क्रीडा चळवळीअंतर्गत देशात १९२० मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा विचार सुरू झाला. या चळवळीची खऱ्या अर्थाने १९२४ मध्ये लाहोर (त्यावेळचा पंजाब) येथे मुहूर्तमेढ झाली

The historical heritage of the national sports competition | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा ऐतिहासिक वारसा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा ऐतिहासिक वारसा

Next

पुणे : क्रीडा चळवळीअंतर्गत देशात १९२० मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा विचार सुरू झाला. या चळवळीची खऱ्या अर्थाने १९२४ मध्ये लाहोर (त्यावेळचा पंजाब) येथे मुहूर्तमेढ झाली होती. ‘इंडियन आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धा’ या नावाने ही स्पर्धा भरविण्यात येत होती. पंजाब आॅलिम्पिक असोसिएशनचे सचिव जी. डी. सोधी, लाहोर गव्हर्नमेंट कॉलेजचे उपप्राचार्य एच. एल. ओ गॅरेट हे या चळवळीच्या संस्थापकांपैकी होते.
अगदी १९३८ पर्यंत याच नावाने ही स्पर्धा भरविण्यात येत होती. पहिल्या तीन स्पर्धा लाहोर (१९२४, २६ व २८), अलहाबाद (१९३०), मद्रास (१९३२), नवी दिल्ली (१९३४), लाहोर (१९३६) व कोलकाता (१९३८) येथे ही स्पर्धा झाली. स्वतंत्र्यपूर्व काळात १२वेळा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्या. १२पैकी ६ स्पर्धा स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात गेलेल्या लाहोरमध्ये झाल्या होत्या. त्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनाच्या धामधुमीच्या दशकातदेखील ही स्पर्धा घेण्यात आली होती. या काळात अ‍ॅथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल आणि कुस्ती या खेळांच्या स्पर्धा होत होत्या.
मात्र मुंबईत १९४० मध्ये आयोजित स्पर्धेपासून या क्रीडा स्पर्धा ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा’ या नावाने भरविण्यात येतात. त्या पाठोपाठ पतियाळा (१९४२), लाहोर (१९४४ व १९४६) येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धा व एशियन क्रीडा स्पर्धांच्या नियोजनानुसार या स्पर्धा दर दोन वर्षांनी घेतल्या जातात. (क्रमश:)
(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: The historical heritage of the national sports competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.