सचिनच्या ड्रायव्हिंगची डोकेदुखी

By admin | Published: May 29, 2015 01:42 AM2015-05-29T01:42:47+5:302015-05-29T01:42:47+5:30

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे कारप्रेम सर्वश्रुत आहे. शिवाय त्याला स्वत:ला गाडी चालवणे खुप प्रिय आहे.

The headache of Sachin's driving | सचिनच्या ड्रायव्हिंगची डोकेदुखी

सचिनच्या ड्रायव्हिंगची डोकेदुखी

Next

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे कारप्रेम सर्वश्रुत आहे. शिवाय त्याला स्वत:ला गाडी चालवणे खुप प्रिय आहे. मात्र याच प्रेमापोटी एकदा खुद्द सचिन व पत्नी अंजली यांना चांगलीच डोकेदुखी झाली होती. नुकताच दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सचिनने एक आठवण सांगताना हा किस्सा सांगितला.
याविषयी सांगताना सचिन म्हणाला की, काही वर्षांपुर्वी इग्लंडमध्ये हा प्रसंग घडला होता. स्पोटर््स कार बनवण्याऱ्या एका अग्रगण्य कंपनीने मला आपल्या मर्यादित असणाऱ्या कारपैकी एका कारची टेस्ट घेण्यास सांगितले होते. त्या कारबाबतीत प्रतिक्रीया व ब्रेक्स तपासून पाहण्यास देखील सांगितले. यासाठी मी अंजलीला माझ्यासोबत कारमध्ये बसण्यास तयार केले होते. त्यावेळी मी वेगात गाडी चालवलेली. किती वेगामध्ये हे मी सांगणार नाही. कंपनीने मला ब्रेक्स तपासण्यास सांगितले होते त्याप्रमाणे मी ब्रेक मारला आणि गाडी थांबवली. हे सर्व इतक्या वेगात घडलं की मला व अंजलीला दोघांनाही चांगलेच जाणवल आणि दिवसभर आमचं डोक ठणकत राहिले.’
हा किस्सा सांगतनाच सचिनने यावेळी आपले वेगाच्या प्रती असलेले प्रेम जाहीर केले.


सचिनने नुकताच आपल्या काही मित्रांच्या मदतीने मुंबईतील गो कार्टींग ट्रॅकचे नवीन डिजाईन तयार केले असून, याद्वारे प्रत्येक चालकाला एकमेकांच्या पुढे जाण्याची संधी मिळेल.

Web Title: The headache of Sachin's driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.