जिंकेल तो आत; हरेल तो बाहेर !

By admin | Published: May 27, 2016 04:02 AM2016-05-27T04:02:34+5:302016-05-27T04:02:34+5:30

पहिल्याच सत्रात जेतेपदाचा स्वाद चाखण्यास इच्छुक असलेल्या गुजरात लायन्सला आज, शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल-९ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये विजय नोंदविण्याचे

He wins; Hurry out of it! | जिंकेल तो आत; हरेल तो बाहेर !

जिंकेल तो आत; हरेल तो बाहेर !

Next

नवी दिल्ली : पहिल्याच सत्रात जेतेपदाचा स्वाद चाखण्यास इच्छुक असलेल्या गुजरात लायन्सला आज, शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल-९ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये विजय नोंदविण्याचे आव्हान असेल. ही लढत अर्थात गोलंदाज विरुद्ध फलंदाज अशीच गाजणार यात शंका नाही.
सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने यंदा सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत अव्वल स्थान पटकविले होत; पण पहिल्या क्वालिफायरमध्ये बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सकडून पराभूत झालेल्या गुजरातसाठी दुसरा क्वालिफायर देखील जिंकणे सोपे दिसत नाही. सनरायझर्सविरुद्ध साखळीतील दोन्ही सामने गुजरातने गमविले आहेत. दोन्ही वेळा धावसंख्येचा बचाव करण्यात गुजरातला अपयश आले होते.
आशिष नेहराच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे वेगवान मारा थोडा कमकुवत झालेल्या हैदराबादकडे भूवनेश्वर कुमार आणि मुस्तफिजूर रहमान हे आहेतच. या दोघांनी एलिमिनेटरमध्ये कोलकाताच्या फलंदाजांना चांगलेच बांधून ठेवले होते. लॉयन्सकडे देखील चांगले फलंदाज असल्यामुळे हैदराबादच्या गोलंदाजांना ते चांगले आव्हान देऊ शकतात. ब्रँडन मॅक्यूलमचा सुरुवातीचा धडाका गाजल्यास गुजरातला चांगली सुरुवात मिळू शकते शिवाय ड्वेन स्मिथ हा देखील गुजरातसाठी मोठी खेळी करू शकतो. अ‍ॅरोन फिंच हा आणखी एक फलंदाज स्वत:च्या बयावर सामन्याचे चित्र पालटू शकतो.
सनरायझर्सचा विचार केल्यास युवी आपल्या पूर्वीच्या फॉर्ममध्ये परत आला आहे. याशिवाय शिखर धवन, कर्णधार डेव्हिड वॉर्नर या सलामीवीरांकडून चांगल्या सुरुवातीवर संघाची भिस्त अवलंबून राहील. सनरायझर्सचे वेगवान गोलंदाज आणि लॉयन्सचे तडफदार फलंदाज, अशी रोमहर्षकता अनुभवायला मिळणार आहे. यंदा फायनल कुणीही खेळू शकते; पण एक बाब निश्चित आहे. ती ही की आयपीएलला नवा विजेता मिळेल. आतापर्यंत विजेता राहिलेला एकही संघ यंदा जेतेपदाच्या शर्यतीत उरलेला नाही, हे विशेष. (वृत्तसंस्था)

फिरोजशाह कोटलाची खेळपट्टी थोडी मंद झाली आहेत. त्यावर मारा करणे सोपे नाही. गोलंदाजांचे सुरुवातीपासून फलंदाजांवर वरचढ होण्याचे डावपेच येथे चालू शकणार नाहीत. फलंदाजांना देखील धावा काढण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. काल युवराजसिनगने फलंदाजीच्यावेळी हेच तंत्र अवलंबले.

वॉर्नरने कोलकाताविरुद्ध सामन्याविषयी म्हटले, दोन वेळेसच्या चॅम्पियनविरुद्ध संघाचे क्षेत्ररक्षण खूप महत्त्वपूर्ण होते. आम्ही या स्पर्धेत प्रथमच चांगले क्षेत्ररक्षण केले आणि गुजरातविरुद्धही तशीच कामगिरी करावी लागणार आहे. क्षेत्ररक्षण चांगले केले, तर चुरशीचा सामना जिंकू शकतो, हे आम्हाला माहीत होते. आमच्या खेळाडूंनी सुरेख क्षेत्ररक्षण करताना शानदार झेल पकडले. त्यामुळे आम्ही सामन्यावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरलो. आम्ही प्रत्येक सामन्यात या भागात सुधारणा केली आहे. आम्ही आमचा चांगला बेंचमार्क स्थापित केला आहे आणि यापुढे आणखी सुधारणा करावी लागेल. डावाच्या अंतिम क्षणी बिपुलने ज्या धावा केल्या त्या खूप उपयुक्त ठरल्या. आमच्या कमी धावा झाल्या; परंतु अशा खेळपट्टीवर १६0 च्या जवळपास आव्हानात्मक धावसंख्या असते आणि आमच्या गोलंदाजांनी या धावांचा यशस्वीपणे बचाव केला.

सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने आयपीएल ९ च्या क्वॉलिफायर २ मध्ये आपला प्रतिस्पर्धी गुजरात लायन्सला इशारा देताना त्यांच्या जवळ प्रतिस्पर्धी संघासाठी जबरदस्त व्यूहरचना असल्याचे सांगितले.

हैदाराबाद आणि गुजरात या दोन संघांतील विजयी संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे. लढतीआधी वॉर्नर म्हणाला, ‘दोन्ही संघाला विजयासाठी आपली पूर्ण क्षमता आणि कौशल्य पणाला लावावे लागणार आहे.

गुजरातची दुबळी बाजू आम्हाला माहीत आहे. त्यांच्याकडे ड्वेन स्मिथसारखा खतरनाक खेळाडू आहे; परंतु त्याला रोखण्यासाठी आम्ही व्यूहरचना आखली आहे आणि ही व्यूहरचना आम्हाला अमलात आणावी लागेल.

आमच्या संघासाठी चांगली बाब म्हणजे प्रत्येक खेळाडू प्रत्येक सामन्यात काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वच खेळाडू एकमेकांशी चर्चा करीत आहेत आणि एकमेकांचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कोलकाताविरुद्ध एलिमिनेटरमध्ये आमच्या विजयाचे हेच सर्वांत मोठे कारण होते. भुवनेश्वरसारखा गोलंदाज सातत्याने मोझेस हेन्रिक्ससोबत चर्चा करीत आहे. त्याचा परिणाम तुम्ही पाहातच आहात. हेन्रिक्सने सामन्यात दोन महत्त्वपूर्ण बळी घेतले.’

Web Title: He wins; Hurry out of it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.