अटीतटीच्या लढतीत गुजरातची बाजी

By admin | Published: May 7, 2017 11:44 PM2017-05-07T23:44:08+5:302017-05-07T23:44:08+5:30

189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ड़्वेन स्मिथसह सुरेश रैना आणि दिनेश कार्तिकने केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या मदतीने

Gujarat's betting match in terms of conditions | अटीतटीच्या लढतीत गुजरातची बाजी

अटीतटीच्या लढतीत गुजरातची बाजी

Next

 ऑनलाइन लोकमत

मोहाली, दि. 7 -  शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत गुजरात लायन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 6 गडी राखून मात केली. हाशीम आमलाच्या शतकाच्या जोरावर पंजाबने दिलेल्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ड़्वेन स्मिथसह सुरेश रैना आणि दिनेश कार्तिकने केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या मदतीने गुजरातने शेवटच्या षटकात विजय मिळवला. आज झालेल्या पराभवामुळे पंजाबच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. आता  स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी पुढचा प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. 
189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ड्वेन स्मिथ (74) आणि इशान किशन (29) यांनी आक्रमक सुरुवात करत गुजरातला 9.2 षटकात 91 धावांची सलामी दिली. त्यानंतर स्मिथ, रैना (39) आणि फिंच (2) यांच्या विकेट काढत पंजाबने सामन्यात रंगत आणली. पण दिनेश कार्तिकने नाबाद 35 धावांची खेळी करत गुजरातला विजय मिळवून दिला.  
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर मार्टिन गुप्टिलच्या (2) रूपात गुजरातला पहिले यश मिळाले. त्यानंतर मात्र शतकवीर हाशिम आमला (104) आणि शॉन मार्श (58) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी करत पंजाबला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. मार्श बाद झाल्यानंतर आमलाने मॅक्सवेलसोबत (नाबाद 20)  झटपट 60 धावांची भागीदारी करत पंजाबला 20 षटकात 3 बाद 189 धावांपर्यंत मजल मारून दिली. 

Web Title: Gujarat's betting match in terms of conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.